मरणोत्तर अवयवदानाचे प्रमाण मर्यादित

By admin | Published: November 27, 2015 02:53 AM2015-11-27T02:53:47+5:302015-11-27T02:53:47+5:30

‘मरावे परि अवयवरूपी उरावे’ याविषयी गेल्या काही वर्षांपासून जनजागृतीचे कार्यक्रम राज्यपातळीवर हाती घेण्यात आले आहेत. मात्र मरणोत्तर अवयवदानाचे प्रमाण मर्यादित राहिले असून

Limiting the post-organ organs | मरणोत्तर अवयवदानाचे प्रमाण मर्यादित

मरणोत्तर अवयवदानाचे प्रमाण मर्यादित

Next

पूजा दामले,मुंबई
‘मरावे परि अवयवरूपी उरावे’ याविषयी गेल्या काही वर्षांपासून जनजागृतीचे कार्यक्रम राज्यपातळीवर हाती घेण्यात आले आहेत. मात्र मरणोत्तर अवयवदानाचे प्रमाण मर्यादित राहिले असून, रुग्ण व गरजू व्यक्तींना त्यांच्या नातेवाइकांकडूनच अवयवदान करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे उपलब्ध आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. गेल्या २० वर्षांत राज्यात ८ हजार ४३९ जिवंत दात्यांनी अवयव दान केले आहे. मृत व्यक्तींच्या मिळालेल्या अवयवांचा आकडा ७५४ इतका
आहे.
१ जानेवारी १९९५ ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत जिवंत अवयवदात्यांकडून ८ हजार २२२ मूत्रपिंड, २१७ यकृत गरजू रुग्णांना मिळाले आहेत. तर, मृत व्यक्तींकडून झालेल्या अवयवदानातून ५६० मूत्रपिंड, १५८ यकृत, २ फुप्फुसे
आणि इतर ३४ अवयव गरजूंना
मिळाले आहेत. २०१२पासून
म्हणजेच गेल्या ४ वर्षांत मृत
व्यक्तींच्या अवयवदानाचा टक्का वाढलेला आहे.
२०१४मध्ये ८० मूत्रपिंड, ४३ यकृत आणि अन्य १५ अवयवांचे दान झालेले आहे. मृत व्यक्ती अवयवदान करून इतर गरजू रुग्णांना जीवनदान
देऊ शकते, याविषयी अजूनही
जास्त प्रमाणात जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.
व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही जवळचे नातेवाईक अवयवदान करण्यास पटकन तयार होत नाहीत. या मानसिकतेत बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सह संचालक डॉ. गौरी राठोड यांनी सांगितले.
अवयवदान जनजागृती अवयवदान दिनानिमित्त महापालिकेद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहिला कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता आझाद मैदान पोलीस ठाणे येथे होईल. कार्यक्रमात अवयवदान प्रक्रियेमध्ये पोलिसांची भूमिका या विषयावर के.ई.एम. रुग्णालयाच्या डॉ. कामाक्षी भाटे व डॉ. सुजाता पटवर्धन मार्गदर्शन करतील. दुसरा कार्यक्रम दुपारी १.०० वाजता परळमधील केईएममध्ये होईल. ‘ब्रेन डेड’ झालेल्या व्यक्तीचा हात, दुसऱ्या व्यक्तीच्या तुटलेल्या हातावर प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) करण्याची अत्यंत कठीण अशी सूक्ष्म शस्त्रक्रिया (मायक्रो सर्जरी) करणारे केरळमधील कोची येथील डॉ. सुब्रमण्यम अय्यर हे या वेळी मार्गदर्शन करतील.ज्या व्यक्तींना अवयव दानासाठी ‘दाता’ म्हणून नोंदणी करायची असेल, त्यांच्यासाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये दाता नोंदणी करता येईल.

Web Title: Limiting the post-organ organs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.