बाळापूर टि पाईंन्टसाठी पहाटेपासूनच वाहनांची रिघ, बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 09:55 AM2022-11-18T09:55:54+5:302022-11-18T09:56:08+5:30

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून खा‌.राहुल गांधी यांच मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात आगमन होत आहे.

Line of vehicles for Balapur Tea Point from early morning, Congress leaders in Buldhana district protest. | बाळापूर टि पाईंन्टसाठी पहाटेपासूनच वाहनांची रिघ, बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची मांदियाळी

बाळापूर टि पाईंन्टसाठी पहाटेपासूनच वाहनांची रिघ, बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची मांदियाळी

Next

हनुमान जगताप

शेगाव :

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून खा‌.राहुल गांधी यांच मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात आगमन होत आहे. त्या निमित्ताने शुक्रवारी पहाटेपासूनच वेगवेगळ्या वाहनांची रिघ लागली आहे.

स्वागतासाठी काँग्रेसच्या नेत्यांची व जनसामान्यांची मांदियाळी निदर्शनास आली आहे. देशभर निघालेली खा‌.राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्याच्या अंतिम टप्प्यात आहे.आज शुक्रवारी संतनगरी शेगांव येथे संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या दर्शनानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तत्पुर्वी अकोला जिल्ह्यातून बुलढाणा जिल्ह्यात भारत जोडो यात्रेच आगमन होवू घातले आहे.

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील त्याच बरोबर बाहेरच्या जिल्ह्यांतील काँग्रेसचे नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते शेगांव, खामगाव या ठिकाणांसह वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामी होते.आज शुक्रवारी रस्ते बंद करण्यात येतील त्यामुळे पहाटेपासूनच बाळापूर टि पाईंन्टसाठी वाहनांची रिघ लागली आहे. राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेसच्या नेत्यांची व जनसामान्यांची मांदियाळी निदर्शनास येत आहे.

Web Title: Line of vehicles for Balapur Tea Point from early morning, Congress leaders in Buldhana district protest.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.