थेरगावात लिपीकास लाच घेताना रंगेहात पकडले

By admin | Published: November 15, 2016 09:13 PM2016-11-15T21:13:11+5:302016-11-15T21:13:11+5:30

विभागीय लिपीकाला मतदार नोंदणी मधील त्रुटी न काढण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले.

Lipikas caught in a turtle while taking a bribe in Thergaon | थेरगावात लिपीकास लाच घेताना रंगेहात पकडले

थेरगावात लिपीकास लाच घेताना रंगेहात पकडले

Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 15 - विभागीय लिपीकाला मतदार नोंदणी मधील त्रुटी न काढण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच  घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  (एसीबी) पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले. 
एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातील विजयनगर, काळेवाडी येथील नवीन ३०० मतदारांचे अर्ज नोंदणीसाठी मतदान नोंदणी कार्यालयात दिले होते. कार्यालयातील लिपीक प्रल्हाद पाटील याने कागदपत्रांची तपासणी न करता मतदार यादीत नावे नोंदणी करण्यासाठी दोन लाख ४० हजारांची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांच्या सापळ्यात पाटील याने मागितलेल्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून ५० हजारांची रक्कम घेताना त्यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 

Web Title: Lipikas caught in a turtle while taking a bribe in Thergaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.