स्कूटरच्या डिक्कीतून दारुची चोरटी वाहतूक करणारा जेरबंद

By admin | Published: July 11, 2017 10:17 PM2017-07-11T22:17:07+5:302017-07-11T22:17:07+5:30

दोन स्कूटरमधून गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या महेश चौधरी (रा. बदलापूर) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे

The liquor baron from the scooter trunk, | स्कूटरच्या डिक्कीतून दारुची चोरटी वाहतूक करणारा जेरबंद

स्कूटरच्या डिक्कीतून दारुची चोरटी वाहतूक करणारा जेरबंद

Next

आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. 11 - दोन स्कूटरमधून गावठी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या महेश चौधरी (रा. बदलापूर) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी-१ च्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. तर डोंबिवली आणि ठाणे विभागानेही केलेल्या कारवाईत गावठी दारुसह चौघांना अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये दोन स्कूटर, देशी विदेशी मद्यासह एक लाख एक हजार ९०३ रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एका स्कूटरमधून बदलापूरात गावठी दारुची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाणे भरारी-१ चे निरीक्षक संजय कंगणे, दुय्यम निरीक्षक सुनिल देशमुख, अनिल गायकवाड, हवालदार केतन वझे, राजू राठोड आणि कुणाल तडवी आदींच्या पथकाने १० जुलै रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास बदलापूर गावातील हॉटेल राजेंद्र जवळ एका स्कूटरसह महेशला पकडले. या स्कूटरच्या डिक्कीतून देशी आणि विदेशी बनावटीचे मद्य या पथकाने जप्त केले. याच स्कूटरजवळ दुसरीही स्कूटर उभी होती. तीही त्याचीच असल्याचे समजल्यानंतर या पथकाने तिच्याही डिक्कीत तपासणी केली. त्यावेळी दुसऱ्याही स्कूटरमध्ये मद्याचा साठा मिळाला. त्याच्याकडून दोन्ही स्कूटरमधील १२.६० लीटर विदेशी, १३.७७ लीटर देशी मद्यासह दोन स्कूटर असा ८८ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला.
दरम्यान, ठाण्याच्या ‘डी’ विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावर, दुय्यम निरीक्षक पी. पी. घुले यांच्या पथकानेही मंगळवारी दुपारी (११ जुलै रोजी) खर्डी गावातील दिवा शीळ रस्त्यावरील महादू निघूकर यांच्या घराशेजारी दत्ता निघूकर यांच्याकडून देशी आणि विदेशी मद्यासह सहा हजार ६८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. डायघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून दत्ता निघूकर यांना अटक करण्यात आली आहे.
डोंबिवली विभागाचे निरीक्षक अविनाश रणपिसे यांच्या पथकानेही सोमवारी रात्री मानपाडा येथील हॉटेल राधाकृष्ण आणि कोळसेवाडीतील हॉटेल सेव्हन स्टार येथे छापा टाकून बेकायदेशीर विक्री होणारी २६ लीटर बियर जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
याच पथकाने मंगळवारी दुपारी डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगरातील रोहिदासनगर येथे दारु अवैधपणे विक्री करणाऱ्याला त्यांनी अटक केली.

Web Title: The liquor baron from the scooter trunk,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.