महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या; लागतील तेवढे रस्ते, रोप-वे अन् पूल बांधून देईल- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 12:27 PM2021-09-25T12:27:06+5:302021-09-25T13:12:28+5:30
नितीन गडकरी शुक्रवारी उड्डापुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी विविध संकल्पना आणि मत व्यक्त केलं.
मला देशात पेट्रोल व डिझेलचा वापर बंद करायचा आहे. इथेनॉलचा वापर वाढायला हवा. रशियात इथेनॉलवर वाहने धावण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातही रिक्षा व दुचाकी इथेनॉलवर धावू शकते. सर्वच कार उत्पादकांना फ्लेक्स इंजिनची निर्मिती करण्यास सांगितले आहे. त्यामुळे १०० टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या कारची निर्मिती भारतात होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) म्हणले. नितीन गडकरी शुक्रवारी उड्डापुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी विविध संकल्पना आणि मत व्यक्त केलं.
प्रदुषण कमी करण्यासाठी पोलीस आणि अँब्यूलन्स सोडून मी सर्वांचे लाल दिवे काढून टाकले. सगळ्या मंत्र्यांच्या गाड्यांचे सायरन बंद केले आहेत. मंत्र्यांसाठी सायरन आणि सलामी हा मोठा आकर्षणाचा विषय आहे, असा टोलाही गडकरींनी लगावला. भुसंपादन करून दिलं तर पुण्यात रिंग रोड बांधून देईन, ही मोठी घोषणाही याप्रसंगी गडकरींनी केली. पुणे-बंगळुरू ४० हजार कोटींचा नवा महामार्ग बांधण्याची योजना आहे. तसेच पुणे-बंगळुरू नव्या महामार्गाच्या शेजारी नवं शहर वसवायचं आणि मेट्रोने जोडता येईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
ढूंढते रह जाओगे! 'या' फोटोतील लपलेला उंट शोधून दाखवा; बघा तुम्हाला जमतंय का!
नितीन गडकरी सदर कार्यक्रमाच्या भाषणात म्हणाले की, मी महाराष्ट्राचा ॲम्बेसिडर म्हणून दिल्लीत काम पाहतो. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच विभागांच्या कामांकडे माझे लक्ष असते, असं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. तसेच मला महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या, लागतील तेवढे रस्ते, रोप-वे आणि पूल बांधून देईल, अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
दरम्यान, दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेसचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. तेथील रस्त्यावर १७० किमी वेगाने धावणाऱ्या गाडीत बसलो होतो ; पण पोटातील पाणी हलले नाही. फक्त महाराष्ट्रातील काम राहिले असून, हा मार्ग जेएनपीटीपर्यंत नेणार आहे. वसई-विरारपासून वरळी बांद्र्यापर्यंत हा मार्ग जोडला तर नरिमन पॉईंटवरून थेट दिल्लीला १२ तासांत पोहोचता येईल, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
एसटी दरात मेट्रो प्रवास-
मी अशी मेट्रो शोधली आहे की, त्याच्या एक किमीसाठी केवळ १ कोटी रुपये खर्च येईल. त्याचा वेग ताशी १४० किमी प्रतितास असेल. मोफत वायफाय - टीव्ही अशा सुविधा यात असतील. त्यामुळे पुणे ते कोल्हापूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते अहमदनगर, पुणे ते लोणावळा, पुणे - बारामती या मार्गावरून मेट्रो सुरू करता येईल. त्याचा दर एसटीएवढा असेल.
...तर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार; मुंबई महापालिकेचा सावध पवित्रा https://t.co/VyWlIi2djh
— Lokmat (@MiLOKMAT) September 25, 2021