अकरावीची यादी आज होणार जाहीर
By admin | Published: July 4, 2017 05:38 AM2017-07-04T05:38:24+5:302017-07-04T05:38:24+5:30
अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिला महत्त्वाचा अर्ज भरण्याचा टप्पा ३० जून रोजी पूर्ण झाला. आॅनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जात काही चुका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिला महत्त्वाचा अर्ज भरण्याचा टप्पा ३० जून रोजी पूर्ण झाला. आॅनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जात काही चुका झाल्या आहेत का, गुणवत्ता यादीत कोणत्या क्रमांकावर विद्यार्थी आहे, याविषयी माहिती मिळावी, म्हणून ४ जुलैला सकाळी ११ वाजता अकरावीची सर्वसाधारण यादी आॅनलाइन जाहीर होणार आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. पहिला अर्ज अनेक विद्यार्थ्यांनी निकालाच्या आधीच भरून पूर्ण केला होता. त्यानंतर, १३ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाला. १६ जूनपासून विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीने दुसरा अर्ज भरण्यास सुरुवात केली, पण हा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या गोंधळामुळे अकरावी आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत २ दिवस वाढवून देण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले, पण मनात भीती आहे. त्यामुळे उद्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण, त्यांचा सर्वसाधारण कोणता क्रमांक आहे, तसेच विद्यार्थ्यांची माहिती तपासता येईल.