‘दीपोत्सव’मधील अनुभव प्रत्यक्ष ऐका आणि पाहा !
By Admin | Published: November 6, 2016 03:39 AM2016-11-06T03:39:35+5:302016-11-06T03:39:35+5:30
देशाचे दक्षिण आणि उत्तर टोक जोडणारा तब्बल पस्तीस दिवसांचा प्रवास... एन एच 44 या राष्ट्रीय महामार्गावरून वाटेतली अकरा राज्ये ओलांडताना भेटलेली माणसे...
- आज ‘एबीपी माझा’वर
मुंबई : देशाचे दक्षिण आणि उत्तर टोक जोडणारा तब्बल पस्तीस दिवसांचा प्रवास... एन एच 44 या राष्ट्रीय महामार्गावरून वाटेतली अकरा राज्ये ओलांडताना भेटलेली माणसे... बदलांच्या, बदलत्या माणसांच्या, जागतिकीकरणोत्तर भारताच्या धमन्यांमधून धावणाऱ्या आत्मविश्वासाच्या आणि आकांक्षांच्या कहाण्या... हा आहे या वर्षीच्या ‘दीपोत्सव’चा आत्मा!
लोकमत वृत्तसमूहाच्या या बहुचर्चित दिवाळी अंकातून महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर जगभरच्या मराठी वाचकांमध्ये गाजणारी ही रोडट्रीप प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी आज, रविवारी मिळणार आहे एबीपीमाझा वृत्तवाहिनीवर!
एन एच 44 या विशेष प्रकल्पाच्या संपादक अपर्णा वेलणकर आणि हा प्रवास केलेल्या पत्रकार-छायाचित्रकारांची टीम यांच्याबरोबरच्या गप्पांमधून उलगडणारा हा प्रवास आज प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. ही रोडट्रीप आखतानाचे आणि प्रत्यक्ष प्रवासातले अनुभव अनुभव, गंमती, रस्त्यावरच्या सामान्य माणसांनी केलेल्या निर्व्याज प्रेमाच्या, दिलदार विश्वासाच्या कहाण्या हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
दीपोत्सव : दोन लाखांकडे
झेपावणारा अंक नव्हे, उत्सव!
महाराष्ट्रात सर्वत्र अंक उपलब्ध
घरपोच अंक मिळवण्याची व्यवस्था
http://deepotsav.lokmat.com/ या संकेतस्थळावर आॅनलाईन पेमेंटद्वारे प्रती खरेदी करून भारतभरात कुठेही परस्पर पाठवता येतील.