तत्वत: शब्दाची काळजी वाटते - पवार
By Admin | Published: June 12, 2017 02:23 AM2017-06-12T02:23:44+5:302017-06-12T02:23:44+5:30
सरकारने काही निकषांच्या आधारे सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली असली तरी, ‘तत्वत:’ आणि ‘निकष’ या शब्दांचीच काळजी वाटते
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सरकारने काही निकषांच्या आधारे सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली असली तरी, ‘तत्वत:’ आणि ‘निकष’ या शब्दांचीच काळजी वाटते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची सुकाणू समितीची मागणी होती.
अल्पभूधारकांचे कर्ज सरकारने मंजूर केले, पण सरसकट कर्जमाफीसाठी तत्वत: मान्यता देऊन सरकारने वेळ मारून नेली आहे. नवे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने तातडीने पावले उचलावित अशी सूचनाही पवार यांनी केली.