पुरस्कार वापसीविरोधात साहित्यिकांचे मोदींना समर्थन
By admin | Published: November 6, 2015 01:01 AM2015-11-06T01:01:56+5:302015-11-06T01:01:56+5:30
देशात पुरस्कार वापसीवरून वातावरण ढवळून निघाले असताना, पुण्यातील काही साहित्यिकांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांचा हेतू आणि त्यांनी निवडलेल्या वेळेबाबत शंका घेऊन
पुणे : देशात पुरस्कार वापसीवरून वातावरण ढवळून निघाले असताना, पुण्यातील काही साहित्यिकांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांचा हेतू आणि त्यांनी निवडलेल्या वेळेबाबत शंका घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिले आहे. देशातील सत्तापरिवर्तन पचनी पडले नसल्यानेच ही टूम काढून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांच्या पुढाकाराने साहित्यिकांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यात प्रा. द. मा. मिरासदार, डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, उत्तम बंडू तुपे, डॉ. वीणा देव, प्रा. प्र. के. घाणेकर, प्रा. वसंत मिरासदार, डॉ. मुकुंद दातार, डॉ. भीमराव गस्ती, प्रा. विरुपाक्ष कुलकर्णी, उमा कुलकर्णी, आशुतोष बापट यांचा समावेश आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याला बाधा आणणाऱ्या वातावरणावर चिंता व्यक्त केली जाते. मात्र, त्याहीपेक्षा भयानक वातावरण यापूर्वी निर्माण झाले होते, तेव्हा या साहित्यिकांनी मौन बाळगले, अशी टीकाही पत्रकात केली आहे.