छोटा बच्चा जान के हमको..!

By admin | Published: November 9, 2014 01:12 AM2014-11-09T01:12:15+5:302014-11-09T01:12:15+5:30

भांडवलशाही व्यवस्थेत बाजाराला खूप महत्त्व असते आणि इथे आपापला माल विकण्यासाठी उत्पादकांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू असते.

Little baby jan ki us ..! | छोटा बच्चा जान के हमको..!

छोटा बच्चा जान के हमको..!

Next
भांडवलशाही व्यवस्थेत बाजाराला खूप महत्त्व असते आणि इथे आपापला माल विकण्यासाठी उत्पादकांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू असते. आपल्या उत्पादनाचे महत्त्व ग्राहकांच्या मनावर बिंबविण्याचा सर्वात परिणामकारक उपाय म्हणजे जाहिरात. त्यामुळेच जाहिरातीला पासष्ठावी कला म्हटले जाते. या कलेच्या माध्यमातून ग्राहकांवर निरनिराळ्य़ा प्रलोभनांचा मारा केला जातो. दिवाळी असो वा दसरा, ख्रिसमस असो वा गुढीपाडवा बाजारात निरनिराळ्या ऑफर्स असतात. 1क् रुपयांचा बिस्कीटचा पुडा घ्या आणि सिंगापूरला जाण्याची संधी मिळवा. 2क् रुपयांचे वेफर्स घ्या आणि ऑडी कार जिंका. सध्या इपी नुडल्सची जाहिरात खूप चर्चेत आहे. तिचे टॅगलाइन आहे - इपी टू रुपी. अवघ्या 2क् रुपयांच्या खरेदीवर तब्बल 50 हजार रुपयांची शॉपिंग करण्याची संधी (अर्थात भाग्यवान विजेत्यांना) त्यात देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या ऑफर्समुळे बाजारात मग त्या विशिष्ट ब्रँडची तडाखेबंद विक्र ी होते. हे नेमके का होते माहितीय ?
 
सध्या धकाधकीच्या युगात जगण्यासाठी झगडताना घरातील पालक प्रचंड बिझी असतात, इतके की त्यांना त्यांच्या मुलांसाठी पुरेसा वेळही देता येत नाही. त्यात पुन्हा पूर्वीसारखी एकत्न कुटुंबपद्धती नाही, आजी-आजोबा नाहीत. काँक्रिटच्या या जंगलात मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत, मग मुलांनी करायचं तरी काय ? त्यामुळेच मुलांचे हल्ली टीव्ही पाहण्याचं वेड वाढलंय. उत्पादकांनी टीव्ही पाहणा:या या वर्गावर प्रभाव टाकण्यासाठी छान क्लृप्त्या लढवून एकापेक्षा एक जाहिराती तयार करण्यास सुरुवात केली. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळू लागलाय. मुले दिवसभर टीव्ही पाहतात आणि दमलेल्या बाबाच्या गोष्टीतल्यासारखं थकूनभागून घरी येणा:या वडिलांकडे  ‘हे आणा, ते आणा’ असा हट्ट धरतात. त्यांना त्या विशिष्ट वस्तूंविषयी सर्व काही माहिती असते. म्हणजे ती कुठे मिळते, तिची किंमत काय, त्यावर काय फ्री आहे, लकी ड्रॉ आहे का, असा सर्व तपशील त्यांच्याकडे असतो. त्यामुळे याबाबतीत तुम्ही  मला माहीत नाही, अशी सबब सांगू शकत नाही. इथे आई-बाबा हरतात, पण विशिष्ट उद्दिष्ट डोळ्य़ासमोर ठेवून जाहिरात बनविणारे मात्न जिंकलेले असतात. 
जेव्हा एखादी कंपनी त्यांचे प्रॉडक्ट घेऊन आमच्याकडे येते, तेव्हा त्याची सर्व माहिती पुरवते. त्यात त्याचा रंग, रूप, सहभागी घटक आदींचा समावेश असतो. त्यानंतर त्या उत्पादनाचा क्रिएटिव्ह प्रवास सुरू होतो. उदा. किंडोजॉय चॉकलेट. 35-40 रुपयांचे हे चॉकलेट 90 टक्के मुले त्यातील खेळण्यासाठी विकत घेतात. मग आपण हे खेळणं त्याला स्वतंत्नपणो घेऊन देऊ शकत नाही का? अगदी सहज. पण मुलांना त्या अंडाकृती कव्हरच्या आत दडलेल्या खेळण्यातच जबरदस्त इंटरेस्ट असतो. माङया मुलीला तर मी कधीच त्यातील चॉकलेट खाताना पाहिलेले नाही, पण हट्ट मात्न कायम त्याचाच असतो. तशीच काहीशी परिस्थिती मॅक्डोनल्डची असते. टीव्हीवरील टेंपटेशन आणणा:या जाहिराती पाहून मुले हरखून जातात. 
डॉमिनो पिङझाच्या बाबतीतही असेच होते. त्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यात फॅमिली पॅकवर गिफ्ट असतात. केवळ मुलांच्या हट्टाखातर अशाप्रकारच्या बँड्रेड रेस्टॉरंटकडे वळणारी अनेक कुटुंबे आपल्याला दिसतात. बुटक्या मुलाला वर्गातील सर्व मुले हसत असतात. मग उंची वाढविण्यासाठी तो हेल्थ ड्रिंक पितो, मग सर्व त्याचे मित्र बनतात. खरेतर ही काही सर्रास आढळून येणारी उणीव नाही. मात्र  तरीही अशा प्रकारची जाहिरात पाहून हेल्थ ड्रिंक पिऊन आपले सारे काही ठीक होईल, ही भावना वाढीस लागते. त्यातून त्या उत्पादनाची तडाखेबंद विक्री होते. सव्र्हिस इंडस्ट्रीमध्ये अशाच पद्धतीने मुलांच्या मानसिकतेचा आणि पालकांच्या भावनांचा वापर करून घेतला जातो. याबाबतीत अनेक उदाहरणो देता येतील. मुलांच्या उच्च शिक्षणाची आर्थिक तरतूद तुम्ही केली आहे का, अचानक वडिलांचा मृत्यू झाला तर मुलांचे भवितव्य काय, मुलांना परदेशात फिरायला जाण्याचे स्वप्न तुम्ही साकार करू शकाल का, तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचे सर्व सुखसोयींनी युक्त घर देऊ शकाल, अशा पद्धतीच्या जाहिराती इन्श्युरन्स आणि पर्यटन कंपन्या करून आपल्या काळजाला हात घालत असतात.
टीव्ही, इंटरनेट आणि इतर सोशल मीडियामुळे आता मुले विविध प्रकारच्या ब्रँडेड वस्तूंबाबत अतिशय सजग असतात. त्यांना जीवनात अथपासून इतिर्पयत सर्व काही ब्रँडेड हवे असते. वेळ न देऊ शकणा:या आई-वडिलांचे इमोशनल ब्लॅकमेलिंग करून मुले त्यांच्याकडून महागडय़ा ब्रँडेड वस्तू उकळू लागली आहेत. पालकांनाही येनकेन प्रकारेण मुलांना खूश ठेवायचे असते. त्यामुळे ते त्यांच्या हट्टाला बळी पडतात. 
आता हे योग्य की अयोग्य, नैतिक की अनैतिक असा प्रश्न काही जण विचारतील. त्याचे एकच एक उत्तर देता येणो शक्य नाही. कारण नाण्याची दुसरी बाजू जर पाहिली तर जाहिरातकत्र्यासाठी हे एक मोठे रोजगाराचे साधन आहे. उत्पादक जाहिरात या माध्यमाचा प्रभावीपणो वापर करून घेत असतात. आर्थिक उलाढालीचा तो एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. सध्याच्या काळात बाजारात निर्माण होणारी प्रत्येक लहान-मोठी वस्तू अथवा दिली जाणारी सेवा आपापला ब्रँड विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकप्रियता आणि उपयोगिता ग्राहकांच्या मनावर ठसविण्यासाठी मग निरनिराळ्य़ा क्लृप्त्या वापरल्या जातात. अर्थात उपलब्ध असणा:या अनेक पर्यायांमधून नेमकेपणाने खरेदी करण्याचा नीरक्षीरविवेक अखेर ग्राहकांनाच दाखवायचा असतो. एक मात्न खरे की ‘जो दिखता हैं वही बिकता हैं’ हा सध्याच्या काळाचा मंत्र आहे. 
दिवसेंदिवस ब्रँडेड वस्तूंचा वापर आणि लोकप्रियता वाढणार आहे. त्यातूनच देशाचा उद्योग-व्यवसाय भरभराटीला येणार आहे. तेव्हा जाहिरातींच्या या झगमगाटी विश्वाकडे आंधळेपणाने नाही, तर डोळसपणो पाहण्याची आवश्यकता आहे.
(लेखिका या महाराष्ट्राच्या 
पहिल्या महिला ब्रँडगुरू आहेत़)
 
- जान्हवी राऊळ

 

Web Title: Little baby jan ki us ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.