LIVE: बाप्पा निघाले गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2016 01:16 PM2016-09-15T13:16:39+5:302016-09-15T19:15:17+5:30

बाप्पाच्या घरी परतण्याचा काळ जसा जवळ आला, तसे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही उत्साहात बाप्पाची मिरवणूक काढून विसर्जन सुरु झालं आहे

LIVE: Bappa leaves the village | LIVE: बाप्पा निघाले गावाला

LIVE: बाप्पा निघाले गावाला

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि, 15 - विघ्न हरून आनंद देणारी बुद्धीची देवता म्हणजे ‘गणपती बाप्पा’, गेले दहा दिवस मुक्कामी आहेत. त्यांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमयी झाले, पण बाप्पाच्या घरी परतण्याचा काळ जसा जवळ आला, तसे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही उत्साहात बाप्पाची मिरवणूक काढून विसर्जन सुरु झालं आहे.
 
श्रीगणेश चतुर्थीपासून बाप्पाचे ठिकठिकाणी स्वागत झाले. बाप्पाच्या सेवेत काहीही कमतरता नको, म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून गणेशभक्त तयारीला लागले. अगदी घरगुती बाप्पाच्या सजावटीपासून ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सजावटीपर्यंत सगळीकडे भाविकांची लगबग सुरू होती. दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर आता बाप्पा आपल्या घरी परतणार म्हटल्यावर, अनेकांचे डोळे पाणावले आहेत. मात्र, आपल्या लाडक्या बाप्पाला अगदी आनंदाने निरोप दिला जात आहे. विघ्नाचे हरण करणाऱ्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडली जावी, यासाठी खबरदारीही भाविक घेत आहेत. विशेष म्हणजे, यंदा पारंपरिक पद्धतीने बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्याचे अनेकांनी ठरविले होते त्याप्रमाणे , लेझीम, टाळ यांचा वापर केला जातआहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ असे म्हणत गणेशभक्त बाप्पाचं विसर्जनासाठी करत आहेत.
 
- कोल्हापूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. प्रथेप्रमाणे तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशाचे सकाळी 8.25 वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली
 
 
गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझीम खेळताना खासदार धनंजय  महाडिक
 
 
- जळगावमधील मिरवणुकीचा उत्साह
 
 
लालबागचा राजा -
 
 
 
 
 

- पुण्यात मुस्लिमांनी केला मानाच्या गणपतीची आरती, भोई प्रतिष्ठानचा उपक्रम

- अहमदनगरमधील मिरवणुकीत महिलांचा सहभाग

- अकोल्यात मिरवणुकीदरम्यान लाठीकाठीचे प्रदर्शन करण्यात आले

 

 

गिरगावात सकाळपासून सुरू असलेली संततधार कमी झालेली नसतानाही आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तानी गर्दी केली आहे

कोल्हापूरमधील गणपती विसर्जन मिरवणूक

 

अहमदनगर- संगमनेर येथे मानाचा सोमेश्वर गणपती मिरवणुकीत पारंपारिक पद्धतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मानाची काठी फिरवताना.

ठाण्यात मोठ्या गणपतींच्या विसर्जनाला सुरूवात

अहमदनगर- नगर शहरातील मानाचा विशाल गणेश दिल्लीगेट बाहेर आला .

 

 

Web Title: LIVE: Bappa leaves the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.