LIVE - जिजाऊंच्या वंदनेनंतर ठाण्यात मराठा मोर्चाला सुरवात

By admin | Published: October 16, 2016 12:48 AM2016-10-16T00:48:21+5:302016-10-16T12:46:56+5:30

मराठा मोर्चाला जिजाऊ वंदनेनंतर सुरूवात, एकनाथ शिंदे, सचिन सावंत, जितेंद्र आव्हाड, रविंद्र फाटक मोर्चात सहभागी

LIVE - The beginning of the Maratha Morcha after Jijau Vandan | LIVE - जिजाऊंच्या वंदनेनंतर ठाण्यात मराठा मोर्चाला सुरवात

LIVE - जिजाऊंच्या वंदनेनंतर ठाण्यात मराठा मोर्चाला सुरवात

Next

- मराठा मोर्चाला जिजाऊ वंदनेनंतर सुरूवात, एकनाथ शिंदे, सचिन सावंत, जितेंद्र आव्हाड, रविंद्र फाटक मोर्चात सहभागी

- स्वच्छता राखण्याचे आणि घोषणा न देण्याचे चौकाचौकात आवाहन

- मराठा समाज बांधवासाठी 6 ठिकाणी मेडिकल कैंप, तिन हात नाका, नितिन कम्पनी, कैडबरी, साकेत, खारे गांव टोल नाक, कळवा येथे मेडिकल टीम तैनात आहेत.


- ठाण्यात मराठा मोर्चाला सुरवात, तीन हात नाक्यावर गर्दी जमन्यास सुरवात


- मीरा भाईंदर मधून मराठा क्रांती मूक मोर्चास सुरवात, काशिमीरा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली मोर्चास सुरवात, ठाण्याच्या दिशेने रवाना.

- ठाण्यातील मराठा मोर्चासाठी मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक आज रद्द,तर वेस्टर्न मार्गावर शनिवारीच ब्लॉक घेतल्याने आजची वाहतूक सुरळीत.

 

 

ऑनलाइन लोकमत

ठाणे : राज्यातील मराठा क्रांती मूक मोर्चा रविवारी ठाण्यात गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. या वेळी खासगी वाहनांमुळे वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी रेल्वेच्या ४० अतिरिक्त लोकल सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मोर्चावर ड्रोनसह सीसीटीव्ही आणि वॉच टॉवर्सद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असून, नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस मदत कक्ष आणि आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली आहे. मोर्चाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडीओ शूटिंग होणार असून, ठिकठिकाणी स्क्र ीन लावल्या आहेत. रविवारी सकाळी १० वाजता तीनहात नाक्यापासून तो निघणार आहे. नंतर गोखले रोडवरून गावदेवी मैदानाला वळसा घालून तलावपाळी, चिंतामणी चौक, टेंभीनाक्यामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला, अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याला आणि पुढे जाऊन कोर्टनाक्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे.
मोर्र्चेकऱ्याच्या वाहनांसाठी बाळकुम येथील बायपास रस्ता, रुस्तमजी येथील सर्व्हिस रोड, बाळकुम येथील महापालिका मैदान, रेतीबंदर रोड, पारसिक टोल बायपास, पारसिकनगर डीपी रोड, विहंग हॉटेल ते पातलीपाडा सर्व्हिस रोड, हरिओमनगर येथील जकातनाका आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. (प्रतिनिधी)

सर्व धर्मीयांचा पाठिंबा
मराठा क्रांती मूक मोर्चाला मुस्लीम, दाऊदीजैन, मारवाडी, गुजराती, गुजर, कोळी, आगरी, कुणबी आदींनी पाठिंबा देऊन, मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.


- दरम्यान, रविवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या प्रसारासाठी जिल्ह्यातील ठाणे, शहापूर, भिवंडीत बाईक रॅली काढल्या आहेत.

Web Title: LIVE - The beginning of the Maratha Morcha after Jijau Vandan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.