"यहाँ जीना हैं मुश्किल" ; मर्सर संस्थेच्या जागतिक सर्वेक्षणात मुंबईचा 57 वा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 05:01 PM2017-06-22T17:01:42+5:302017-06-22T18:51:27+5:30

मुंबईतील वैभवशाली वास्तू पाहण्यासाठी, येथील समुद्रीकिना-यांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील पर्यटक मुंबईत येतात .

"Live here are difficult"; In the global survey of the Mercer Society, Mumbai ranked 57th | "यहाँ जीना हैं मुश्किल" ; मर्सर संस्थेच्या जागतिक सर्वेक्षणात मुंबईचा 57 वा क्रमांक

"यहाँ जीना हैं मुश्किल" ; मर्सर संस्थेच्या जागतिक सर्वेक्षणात मुंबईचा 57 वा क्रमांक

Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे आकर्षण जगभरातील लोकांना आहे . मुंबईतील वैभवशाली वास्तू पाहण्यासाठी, येथील समुद्रीकिना-यांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील पर्यटक मुंबईत येतात. तसेच अनेक परदेशी नागरिक नोकरीनिमित्त, शिक्षणासाठीही मुंबईत येतात. मात्र, मर्सर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई हे पर्यटकांसाठी आणि नोकरीनिमित्ताने आलेल्या नागरिकांसाठी महाग शहर ठरले आहे. येथे होणारा अर्थार्जनाचा खर्च हा अधिक आहे. जागतिक क्रमवारीत मुंबईचा ५७ वा क्रमांक लागतो. २०१६ साली मुंबईचा ८२ वा क्रमांक होता.
 
मर्सर संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील शहरांमधील जीवनावश्यक खर्चाबाबत सर्वेक्षण केले जाते . यंदा केलेल्या सर्वेक्षणात मुंबई ५७ व्या क्रमांकावर आहे. अँगोला या देशाची राजधानी असलेल्या ल्युएण्डा हे शहर जगातील सर्वात महाग शहर ठरले आहे . हे शहर सर्वेक्षणात प्रथम स्थानावर आहे. भारताचा विचार केल्यास पर्यटकांसाठी मुंबई सर्वात खर्चिक ठरत आहे . या सर्वेक्षणात नवी दिल्ली ९९ व्या स्थानावर आहे . तर चेन्नई (१३५), बंगळूरु(१६६), कोलकाता (१८४) या शहरांचाही समावेश आहे . मुंबईने या क्रमवारीत ऑकलँड (६१), डल्लास आणि पॅरिस (६२), कॅनबेरा (७१), सीटल (७६), आणि व्हिएना (७८) या शहरांना मुंबईने मागे टाकले आहे. मुंबईमध्ये जेवण आणि हॉटेलचा खर्च सर्वाधिक आहे . चीज, बटर, मासे, मटण यांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत .
 
जगभरातील पर्यटकांची याच खाद्यपदार्थांना अधिक पसंती मिळते. याशिवाय कांदे, टोमॅटो, अननस यासारख्या फळे आणि भाज्यांच्या किमतीमध्येही मोठया प्रामाणात वाढ झाली आहे . वाहतुकीचा खर्चही मुंबईत अधिक दिसून आला आहे . टॅक्सी आणि रिक्षाचे भाडेही मोठया प्रमाणात वाढले आहे.
 
ट्युनिस (२०९), बिशकेक (२०८), कोपजे आणि विन्डोक (२०६), ब्लाटायर (२०५), बिलीसी (२०४), मॉन्टेरेरी(२०३), सॅराजेवो (२०२), कराची (२०१) आणि मिन्स्क (२००) ही जगातील सर्वात स्वस्त शहरे आहेत असे या सर्व्हेक्षणात नमूद केले आहे . लुएन्डा या शहरानंतर हॉंगकॉंग (२), टोकियो (३), झ्युरिच (४), सिंगापूर (५) ही  जगभरातील महागडी शहरे आहेत . याशिवाय सीऊल, जिनेव्हा, शांघाय, न्यूयार्क, बर्न या शहरांचा क्रमवारीत पहिल्या दहामध्ये समावेश आहे. या यादीमध्ये युरोप खंडातील शहरांचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे .
 
या  सर्वेक्षणाविषयी अधिक माहिती देताना मर्सरच्या भारतातील प्रमुख रुचिका पाल यांनी सांगितले की, २०१६ साली जाहीर झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे घरांच्या किमती मोठया प्रमाणात वाढल्या तर भाड्याने घर घेऊन तात्पुरती स्वताची सोय करणा-यांची संख्या वाढली. यामुळे या किमतीमध्येही आपसूकच वाढ झाली. असे रुचिका पाल यांनी सांगितले.
 
देशातील शहरांची क्रमवारी-
शहर                   २०१७-२०१६
मुंबई                   ५७-८२
नवी दिल्ली           ९९-१३०
चेन्नई                   १३५-१५८
बंगळुरू              १६६-१८०
कोलकाता            १८४-१९४ 
 

Web Title: "Live here are difficult"; In the global survey of the Mercer Society, Mumbai ranked 57th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.