लिव्ह इन रिलेशनशिप ही एक समस्या

By admin | Published: November 13, 2016 02:57 AM2016-11-13T02:57:08+5:302016-11-13T02:57:08+5:30

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ही एक समस्या असून राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये ५० पैकी सात ते आठ तक्रारी त्याच विषयीच्या असतात. त्यातच एकत्र कुटुंबपद्धती लोप

Live is a problem in relationships | लिव्ह इन रिलेशनशिप ही एक समस्या

लिव्ह इन रिलेशनशिप ही एक समस्या

Next

पुणे : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ही एक समस्या असून राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये ५० पैकी सात ते आठ तक्रारी त्याच विषयीच्या असतात. त्यातच एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालली असून पातळ होणारी कुटुंबसंस्था वाढत आहे. त्यामुळे पूर्वीची जीवन शैली टिकवण्यात आपण कमी पडत आहोत. तसेच महिलांवरील अन्याय अत्याचाराबरोबरचयांसारखी आव्हानेही समाजासमोर आहेत, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
भारतीय स्त्री शक्तीच्या नवव्या महाराष्ट्र प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी नॅनो टेक्नॉलॉजी क्षेत्रातील संशोधक डॉ. सुलभा कुलकर्णी, पुणे विभागाच्या अध्यक्षा अश्विनी बर्वे, सचिव संध्या देशपांडे, स्वागताध्यक्षा डॉ. मनीषा खळदकर, माधुरी साकुळकर सुनंदा दातार आदी उपस्थित होते. यावेळी ‘ती’ची तंत्र भरारी आंगण ते अंतराळ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
रहाटकर म्हणाल्या, की दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळून महिला विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. एकाच समाजातील महिलांसाठी दोन वेगवेगळे कायदे असू नयेत. त्यामुळे या पिडीत महिलांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. महिलांवरील अन्याय, अत्याचार अद्याप कमी झाले नाहीत. हुंड्याचे स्वरुप बदलू लागले आहे. महिला अत्याचारांवरील कायदे सक्षम करून त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. (प्रतिनिधी)

Web Title: Live is a problem in relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.