Milk Supply Live Update - दूध दरवाढ आंदोलन चिघळलं, बुलडाण्यात एसटी बसची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 07:28 AM2018-07-19T07:28:21+5:302018-07-19T16:45:33+5:30

स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन अजून तीव्र होणार

Live Update No Milk Supply In Maharashtra As Farmers' Unions Go On Strike | Milk Supply Live Update - दूध दरवाढ आंदोलन चिघळलं, बुलडाण्यात एसटी बसची तोडफोड

Milk Supply Live Update - दूध दरवाढ आंदोलन चिघळलं, बुलडाण्यात एसटी बसची तोडफोड

Next

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रतिलीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली आणि नागपुरात बैठका झाल्या. मात्र या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या. दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाच्या दालनात बैठक पार पडली. मात्र या बैठकीत दूध दरावर कुठलाही तोडगा निघाला नाही. 

LIVE UPDATES -

- नागपूर : दूध आंदोलनप्रश्नी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक, मुख्यमंत्र्यांसह नितीन गडकरीही उपस्थित

- सांगली : खानापूर तालुक्यातील बलवडी येथील फाट्यावर, बलवडी, जाधवनगर येथील शेतकरी संघटनेने रस्त्यावर दूध ओतले.

- सोलापूर - रिधोरे येथे दूध दरवाढीसाठी शेतकरी जनावरसह रस्त्यावर, रास्ता रोको आंदोलन सुरू

- हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन.

- सांगली : आरवडे येथे दूध उत्पादकांनी दूध वाहतूक करणारी गाडी अडवून 1500 लिटर दूध ओतून टाकले.

- आता माघार नाही; ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार - राजू शेट्टी

- बाहेरील राज्यातील दुधाला अनुदान मिळते, मग आमच्या शेतकऱ्यांना अनुदान का नाही? - राजू शेट्टी 

- शेतकऱ्यांना किमान 25 ते 27 रुपये भाव मिळायलाच हवा, ते कसं शक्य आहे हे आम्ही सरकारला दाखवून दिलं आहे – राजू शेट्टी

- शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु राहील. सरकारला वेळ लागणार असेल तर वेळ देऊ, पण दीर्घकालीन मार्ग निघावा – राजू शेट्टी

- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद

- रस्त्यावर जनावरं बांधून राज्य सरकारचा निषेध

- रास्ता रोकोमुळे ग्रामीण भागातील वाहतूक खोळंबली

- दुभती जनावरं घेऊन दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर

- सोलापुरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात

- सोलापूर : दूध दरवाढीविरोधात वैराग-माढा रस्त्यावर शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

- मुंबईमध्ये दुधाचा पुरवठा उशिरानं, काही ठिकाणी दुधाचे टँकर पोहोचले नाहीत 

- मुंबई : काही भागात अमूल दुधाचा तुटवडा, प्रभात, मदर डेअरीचे दूध उपलब्ध

- मुंबई : महाराष्ट्रात गुजरातमधून येणाऱ्या अमूल दुधाच्या विक्रीला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध

- राजू शेट्टींच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पाठिंबा

- पुण्यात चितळे समूहाचं दूध वितरण आज बंद

- नागपूर : दूध कोंडी टाळण्यासाठी मध्यरात्री राजू शेट्टी आणि गिरिश महाजन यांच्यात बैठक, अद्याप तोडगा नाही, कोंडी फोडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आज बैठक

- बुलडाणा : दूध दरवाढ आंदोलन चिघळले.

- नागपूर- बुलडाणा एसटी बसची वरवंड फाट्यावर "स्वाभिमानी" च्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड तोडफोड करण्यात आली

- मुंबई- दूध दरावर अद्याप तोडगा नाही, हक्काचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार- राजू शेट्टी

- स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन अजून तीव्र होणार, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

Web Title: Live Update No Milk Supply In Maharashtra As Farmers' Unions Go On Strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.