मुंबापुरीत 'एक मराठा, लाख मराठा'चा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 07:37 AM2017-08-09T07:37:35+5:302017-08-09T16:52:00+5:30

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा ऐतिहासिक अशा मूकमोर्चाला सुरुवात झाली आहे.

Live Updates: Mumbai ready for the Maratha Kranti Morcha | मुंबापुरीत 'एक मराठा, लाख मराठा'चा एल्गार

मुंबापुरीत 'एक मराठा, लाख मराठा'चा एल्गार

googlenewsNext

मुंबई, दि. 9 - आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा ऐतिहासिक अशा मूकमोर्चाला सुरुवात झाली आहे. अवघी मुंबापुरी मराठामय झाली आहे. भायखळा येथील राणीबागेहून मोर्चाला सुरुवात झाली असून पुढे हा मोर्चा अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल. मोर्चेकरांच्या मागण्यांबाबत सर्वपक्षीय आमदार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेतून आलेला निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसमोर मांडला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

LIVE UPDATES 

सहा मुलींच्या शिष्ठमंडळानी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांना दिलं निवेदन. शिष्ठमंडळाची मुख्यमंत्र्यासोबतची बैठक संपली. पण मुख्यमंत्री अजूनही बैठकीत आहेत.

मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर धडकला. मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी.

सीएसटी परिसरात मराठा आंदोलक दाखल 

सीएसटी रेल्वे स्टेशनवर मोर्चेकरांची गर्दी

मराठा क्रांती पुस्तकांची विक्री

गर्दीनं अॅम्ब्युलन्सला करुन दिला रस्ता

मराठा आंदोलकांसहीत विनायक मेटे

खडा पारसी पूल परिसरातील गर्दी

चेंबूर : पांजरापोळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासहीत मराठा आंदोलक 

नवी मुंबईतील आंदोलक

मावळ्याचा पोषाख परिधान केलेले आंदोलक

 

मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आझाद मैदानावर दाखल झाले आहेत.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील सर्व कामकाज बंद. माथाडी, व्यापारी  मोर्चात सहभागी. 

वाशी टोल नाक्यावर सुरळीत वाहतूक. कोंडी टाळण्यासाठी टोल वसुली बंद. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत मोठी 3000 तर लहान 200 वाहने मुंबईला रवाना.     

500 महिलांची तुकडी रवाना

अंधेरी,जोगेश्वरी येथील 500 महिलांची तुकडी मोर्चामध्ये सहभागी. 

गोरेगावमधून 50 ते 60 हजार लोक मोर्चात सहभागी 

गोरेगाव  येथून 50 ते 60 हजार मराठा बांधव मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झाल्याची माहिती संदीप जाधव यांनी दिली. यावेळी कोपर्डीचे सरपंच सतीश सुर्दीक, माजी नगरसेवक सदाशिव पाटील उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण देऊन आमच्या अन्य मागण्या मंजूर झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी संदीप जाधव यांनी केली.

 

राणीबाग मैदानाला जोडून असलेल्या ई. एस. पाटणवाला मार्गावर आंदोलकांची गर्दी

मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांसाठी नाश्त्याची सोय

एकच चर्चा मराठा मोर्चा

चेंबूर फ्री-वेवर वाहतूक नियंत्रित करताना पोलीस अधिकारी

एपीएमसी मार्केट


ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील बेलापूर-सीएसटी ही पहिली 4:30 वाजताची लोकल फुल्ल, ही सर्व मंडळी मराठा मोर्चामध्ये सहभागी नोंदवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तरुणांची खास हेअरस्टाईल  

मोर्चामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी पनवेलहून आंदोलक मुंबईकडे रवाना. मोर्चासाठी नवी मुंबईतून हजारो मराठा बांधव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हार्बर लोकलवर ताण वाढू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

 


राज्यभरातून लाखो मोर्चेकरी मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे ‘एकच चर्चा, मराठा मोर्चा’ असे वातावरण निर्माण झाले आहे. समन्वय समितीने मोर्चाचे सुयोग्य नियोजन केले आहे. आंदोलकांच्या चहा-नाश्तापासून पिण्याचे पाणी, शौचालय, आदी सोयींसह मार्गदर्शनासाठी ६ हजार स्वयंसेवक सज्ज आहेत. त्यांना विशेष टी-शर्ट आणि ओळखपत्रे वितरित करण्यात आली आहेत.

शाळांना सुटी : दक्षिण मुंबईतील शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
२० हजार पोलीस
मोर्चासाठी २० हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरले आहेत.  पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह पाचही सहआयुक्तही येथे आहेत.
जड वाहनांना बंदी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुरूवारी सकाळपर्यंत जड वाहनांना बंदी आहे.

चेंबूरपासून वळवा वाहने
भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येणार आहे.

‘दादर ते जे.जे. अन्य वाहनांना बंद’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे.जे. उड्डाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणापर्यंत दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहे. जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसटीएम जंक्शनपर्यंत दक्षिण व उत्तर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.

प्रश्न तत्काळ सोडवा : राणे
मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असला तरी तिथे प्रतिज्ञापत्र सादर करताना राज्य सरकारने मराठा समाजाची ठाम भूमिका मांडावी. आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा, म्हणजे मोर्चे काढण्याची वेळ या समाजावर येणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.

वैद्यकीय सुविधा सज्ज
छत्रपती शिवाजी महाराज मेडिकोस असोसिएशन (मराठा मेडिकोस असोसिएशन)चे डॉक्टर्स मोर्चातील आंदोलकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. त्यासाठी सर्व डॉक्टर्सना चार ते पाच गटांत विभागले आहे.

Web Title: Live Updates: Mumbai ready for the Maratha Kranti Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.