सोलापूरात जीवनदायी ठरतेय रूग्णांसाठी जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2016 05:41 PM2016-11-15T17:41:21+5:302016-11-15T17:41:21+5:30

शासनाच्या महत्वकांक्षी व सर्वसामान्य कुटुंबातील रूग्णांना जीवनदान ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत आजअखेर सोलापूर जिल्ह्यातील

Livelihood for patients living in Solapur | सोलापूरात जीवनदायी ठरतेय रूग्णांसाठी जीवनदान

सोलापूरात जीवनदायी ठरतेय रूग्णांसाठी जीवनदान

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत/आप्पासाहेब पाटील

सोलापूर, दि. 15 - शासनाच्या महत्वकांक्षी व सर्वसामान्य कुटुंबातील रूग्णांना जीवनदान ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत आजअखेर सोलापूर जिल्ह्यातील ५८ हजार ७२९ रूग्णांवर १२८ कोटी २१५ लाख ४५ हजार ६९० रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन) डॉ़. मल्लिनाथ पट्टणशेट्टी व जीवनदायी आरोग्य योजनेचे समन्वयक रमेश सोनवणे यांनी दिली.
दरम्यान, राज्यात २ जुलै २०१२ पासून सोलापूर जिल्ह्यासह रायगड, धुळे, नांदेड, अमरावती, गडचिरोली, मुंबई शहर व मुंबई उपनगरे या ८ जिल्ह्यात व २१ नोव्हेंबर २०१३ पासून महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू करण्यात आली़. खासगी रूग्णालयाच्या न परवडणा-या खचार्मुळे ही योजना मोफतपणे सुरू करण्यात आली़. १ लाख किंवा कमी उत्पन्न असणा-या कुटुंंबासाठी (पिवळे, केशरी शिधापत्रिका, अन्नपुर्णा आणि अत्योदय कार्ड) धारकांसाठी ही योजना चालू करण्यात आली़. विमा कंपनीच्या सहाय्याने निवडक गंभीर आजारावर ९७१ उपचार पध्दतीनुसार योजनेसाठी निवडलेल्या हॉस्पिटलमधून प्रत्येक कुटुंंबासाठी १़५० लाख मयार्देपर्यंतचा उपचार मोफत करण्यात येत आहेत. शिवाय १२१ पाठपुरावा उपचाराची सोय करण्यात आल्याचेही सिव्हील सर्जन डॉ़ मल्लिनाथ पट्टणशेट्टी व जीवनदायी योजनेचे समन्वयक सोनवणे यांनी सांगितले.
 
राज्यातील ११ लाख रूग्णांवर मोफत उपचार
राज्यात आतापर्यंत १० लाख ६७ हजार १४७ रूग्णांवर विविध प्रकारचा मोफत उपचार करण्यात आले. या उपचारासाठी शासनाकडून आतापर्यंत २ हजार ६२७ कोटी २५ लाख २८ हजार ४५६ एवढा खर्च करण्यात आला. सर्वसामान्य कुटुंबातील रूग्णांसाठी ही योजना जीवनदान ठरत आहे. शिवाय या योजनेमुळे अनेकांचे कुटुंब आर्थिक संकटातून मुक्त झालेले दिसून येत आहेत.
 
आजार व रूग्णांची संख्या
एन्जोप्लास्टीक व हदयरोग शस्त्रक्रिया : २ हजार ७९२, हदयरोग : ६ हजार ३७१, अतिदक्षता विभाग १ हजार १२९, सर्व साधारण शस्त्रक्रिया : १ हजार ००७, डायलेसिस व किडणी रोग उपचार : ७ हजार ०२३, कर्करोग शस्त्रक्रिया व उपचार १३ हजार ९७०, लहान मुलांवर उपचार व शस्त्रक्रिया ३ हजार २३०, पॉलीट्रामा ५ हजार ८३१, स्त्रीरोग शस्त्रक्रिया : ४१०, मेंदू व मज्जारज्जू आजार : १ हजार ४३६, नाक, कान व घसा : ६ हजार ३६०, बर्न : २२४, अस्थिरोग शस्त्रक्रिया १ हजार १९४, जनन व मुत्र संस्थेच्या शस्त्रक्रिया ५ हजार ९९४ आदी आजारांवरील रूग्णांवर उपचार करण्यात आले.
 
२ हजार ०६५ आरोग्य शिबीरे
या योजनेतंर्गत जिल्ह्यात मोफत २ हजार ०६५ आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली होती. या शिबीरामध्ये ६५ हजार ३७५ लाभार्थ्यांची तपासणी व उपचार करण्यात आले. त्यामधील ५ हजार ७६६ गंभीर आजाराचे रूग्ण पुढील उपचारसाठी हॉस्पीटलकडे वर्ग केले आहेत़ यामुळे गंभीर आजारापासून दूर राहून अनेकांचे प्राण वाचले आहेत.
 
२ जुलै २०१६ पासून या योजनेचे नुतनीकरण झाले आहे. या योजनेत समाविष्ठ होणाºया लाभार्थी कुटुंबासाठी वषार्साठी १ लाख ५० हजार रूपयापर्यंतचा खर्च शासनातर्फे मोफत देण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घेऊन खासगी रूग्णालयापासून गरीबांची होणारी लूट थांबवावी.
-डॉ़ मल्लिनाथ पट्टणशेट्टी
सिव्हील सर्जन, सोलापूर
 
सामान्य जनतेसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत वैद्यकीय उपचार देऊन आरोग्य विभागाने जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत आहोत.  जिल्हयातील पात्र रूग्णालयाने पात्र रूग्णांवर मोफत उपचार करणे बंधनकारक आहे. सर्वसामान्यांना एक आधार म्हणून या योजनेची व्याप्ती वाढविणे काळाची गरज आहे.
- रमेश सोनवणे
राजीव गांधी जीवनदायी योजना, जिल्हा समन्वयक, सोलापूर

 

Web Title: Livelihood for patients living in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.