नाशिकहून पुण्यात आणले यकृत
By admin | Published: June 27, 2016 10:05 PM2016-06-27T22:05:05+5:302016-06-27T22:05:05+5:30
नाशिकमधील एका ब्रेनडेड घोषित केलेल्या रुग्णाचे यकृत पुण्याला साडेतीन तासांत आणण्यात आले आहे. या मार्गावर ग्रीन कॉरिडोर करुन २०८ किलोमीटरचे हे अंतर अवघ्या साडेतीन
- २०८ किमीचे अंतर साडेतीन तासात
मुंबई: नाशिकमधील एका ब्रेनडेड घोषित केलेल्या रुग्णाचे यकृत पुण्याला साडेतीन तासांत आणण्यात आले आहे. या मार्गावर ग्रीन कॉरिडोर करुन २०८ किलोमीटरचे हे अंतर अवघ्या साडेतीन तासांत कापणे शक्य झाले.
नाशिकमधील सह्याद्री रुग्णालयात ६७ वर्षीय रुग्णाला २५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला अंत:रक्तस्त्राव होत असल्याने तो उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. २६ जूनला या रुग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. २७ जूनला पुण्याच्या ५० वर्षीय रुग्णासाठी अवघ्या साडेतीन तासात यकृत पुण्याच्या रुग्णालयात आणले गेले.
गेल्या मे महिन्यांत नाशिकहून यकृत पुण्यात आणले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी औरंगाबादहून पुण्यात यकृत आणले होते. आणि तिसऱ्यांदा २७ जून रोजी नाशिकहून पुण्याला यकृत आणण्यात आले आहे. नाशिक ते पुणे हे अंतर २०८ किमी इतके आहे. हे अंतर कापण्यास सुमारे सहा तासांचा वेळ लागतो. ग्रीन कॉरिडोरमुळे हे अंतर फक्त साडेतीन तासात कापले गेले.
नाशिकहून दुपारी ४ वाजता यकृत घेऊन डॉक्टरांचा चमू निघाला. सायंकाळी ७.३० वाजता पुण्याच्या डेक्कन रुग्णालयात यकृत पोहोचवण्यात आले. तत्काळ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु होती. पुण्याच्या ५० वर्षीय पुरुषास यामुळे जीवनदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)