प्रत्यारोपणामुळे सहा जणांना जीवदान
By Admin | Published: July 7, 2017 03:54 AM2017-07-07T03:54:55+5:302017-07-07T03:54:55+5:30
अपघाती मृत्यूने ऐन तारुण्यात दोघांवर काळाने घातला. नातेवाईकांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अवयवदानाला परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अपघाती मृत्यूने ऐन तारुण्यात दोघांवर काळाने घातला. नातेवाईकांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अवयवदानाला परवानगी दिल्यानंतर ग्रीन कॉरीडॉरद्वारे दोघांचेही अवयव तातडीने रुग्णालयात पोहोचले. पुण्यातील २३ वर्षीय आणि नाशिकमधील ३५ वर्षीय तरुणामुळे सहा जणांना जीवदान मिळाले. एकाच दिवशी ४ मूत्रपिंड, २ यकृत आणि एक हृदय अशा सात अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले.
पुण्यातील २३ वर्षीय तरुणाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. बुधवारी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या रुग्णाला ब्रेन डेड घोषित केले. त्याच्या शरीरातून २ मूत्रपिंड आणि १ यकृत यशस्वीरित्या काढण्यात आले. यापैकी एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील ५६ वर्षीय महिलेवर करण्यात आले. तर एक यकृत त्याच रुग्णालयातील ३९ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आले. एक मूत्रपिंड रुबी हॉलमधील ४२ वर्षीय रुग्णाला देण्यात आले, अशी माहिती झेडटीसीसीच्या विभागाच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.