‘एलएलबी’चे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

By admin | Published: April 27, 2017 02:23 AM2017-04-27T02:23:42+5:302017-04-27T02:23:42+5:30

नोव्हेंबर महिन्यात एलएलबीच्या पहिल्या सत्राची परीक्षा झाली. त्यात नापास झालेल्या काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पुनर्तपासणीला टाकल्या

LLB students awaiting expulsion | ‘एलएलबी’चे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

‘एलएलबी’चे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

Next

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात एलएलबीच्या पहिल्या सत्राची परीक्षा झाली. त्यात नापास झालेल्या काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पुनर्तपासणीला टाकल्या. पण, केटी परीक्षेचा दिवस येऊन ठेपला तरी निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांच मानसिक ताण वाढला आहे.
एलएलबीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी ५०० रुपये आणि परीक्षेचे ५०० रुपये शुल्क भरले आहे. उद्या गुरुवार, २६ एप्रिलला एलएलबीच्या विद्यार्थ्यांची केटी परीक्षा आहे. पण, बुधवार, २५ एप्रिलला रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.
हजारो विद्यार्थी केटीच्या परीक्षेची तयारी करत असतानाच निकाल जाहीर तर झाला नाही ना म्हणून संकेतस्थळावरही लक्ष ठेवून आहेत. परीक्षेच्या अभ्यासाचा ताण असूनही विद्यार्थ्यांकडे सध्या दुसरा पर्याय नसल्याचे स्टुण्डट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले. पुुनर्तपासणीसाठी विद्यार्थ्यांकडून ५०० रुपये घेतले जातात. पुनर्तपासणीत विद्यार्थी पास झाला तरी परीक्षेला बसल्यामुळे शुल्क परत मिळणार नाही. विद्यापीठाने याकडे लक्ष द्यावे, वेळेवर निकाल लावावेत अशी मागणी पवार यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: LLB students awaiting expulsion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.