एलएलएमच्या सीईटीला असावा मराठीचा पर्याय
By admin | Published: April 28, 2017 02:33 AM2017-04-28T02:33:03+5:302017-04-28T02:33:03+5:30
विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मराठी भाषेचा पर्याय निवडून परीक्षा देऊ शकतात. त्याचबरोबरीन प्रवेश परीक्षाही देऊ शकतात.
मुंबई: विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मराठी भाषेचा पर्याय निवडून परीक्षा देऊ शकतात. त्याचबरोबरीन प्रवेश परीक्षाही देऊ शकतात. पण, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी म्हणजे एलएलएमच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा पर्याल उपलब्ध असावा
अशी मागणी स्टुण्डल लॉ कौन्सिसने विद्यापीठाकडे केली आहे.
मुंबई विद्यापीठातून दरवर्षी हजारो विद्यार्थी एलएलबीची पदवी घेऊन बाहेर पडतात. एलएलबीच्या तीन वर्षांच्या आणि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी मराठी भाषेचा पर्याय निवडू शकतात. अनेक विद्यार्थी मराठी भाषेतून पेपर लिहितात. एलएलएमचा अभ्यासक्रमही विद्यार्थी मराठी भाषेतून पूर्ण करु शकतात. पण, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असणाऱ्या परीक्षेला मात्र, विद्यार्थ्यांना मराठीचा पर्याय नाही. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, असे मत कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले.
२०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या एलएलएमच्या अभ्यासक्रमासाठी येत्या २९ मे रोजी सीईटी घेण्यात येणार आहे. गेल्यावर्षी एलएलएमसाठी झालेल्या सीईटी परीक्षेला विद्यार्थ्यांना फक्त इंग्रजीचा पर्याय उपलब्ध होता. यंदाही फक्त इंग्रजीत प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून पेपर लिहिण्यासाठी इंग्रजी भाषेचा पर्याय आहे.
अन्य परीक्षांना ज्या प्रमाणे इंग्रजीबरोबर मराठी प्रश्नपत्रिका देतात त्याचप्रमाणे देण्यात यावी, अशी मागणी कुलगुरूंना करण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)