LMOTY 2019 : रश्मी वहिनींनी केला वडा, खिचडीचा बेत; युतीचं गणित झालं सेट; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 'गुपित'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 09:33 PM2019-02-20T21:33:36+5:302019-02-21T15:19:31+5:30
अनेक रुसवे फुगवे, टीकाटिप्पण्यांनंतर अखेर शिवसेना आणि भाजपाच्या युतीची घोषणा झाली होती. दरम्यान, युतीची नव्याने गाठ बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती होण्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या घडामोडींची माहिती लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअरच्या मंचावर दिली.
मुंबई - अनेक रुसवे फुगवे, टीकाटिप्पण्यांनंतर अखेर शिवसेना आणि भाजपाच्या युतीची घोषणा झाली होती. दरम्यान, युतीची नव्याने गाठ बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती होण्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या घडामोडींची माहिती लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअरच्या मंचावर दिली. मातोश्रीवर आम्ही गेलो तेव्हा रश्मी वहिनींनी आम्हावा वडे आणि खिचडी खावू घातली. त्यामुळे आम्हाला चर्चेला मार्गच राहिला नाही आणि युतीचा प्रश्न मार्गी लागला,'' असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअरच्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रितेश देशमुखने मुलाखत घेतली. त्यावेळी सुरुवातीलाच युतीच्या प्रश्नावरूनी रितेशने मुख्यमंत्र्यांवर बाऊन्सर टाकला. चार वर्षे भांडल्यानंतर निवडणूक जवळ येताच तुमचे हसरे चेहरे दिसले. मला एवढेच विचारायचे आहे की 'तुम जो मुस्कूरा रहे हो.... क्या गम हे जिसको छिपा रहे रहे हो.'' अशी विचारणा रितेशने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ''जो बित गया सो बित गया, अब नई शुरुवात हो, असा विचार आम्ही केला. तशी आम्हाला एकत्र राहायची सवयच आहेच. सध्या देशात असंगाशी संग करणाऱ्या, एकमेकांचे तोंडही न पाहणाऱ्यांच्या आघाड्या होत आहेत. पण आम्ही एकमेकांचे चेहरे पाहिले आहेत. चांगल्या आणि वाईट काळातही आम्ही एकमेकांसोबत होतो.आमच्यामध्ये काही कारणांमुळे मतभेद झाले होते. मात्र आता ते मतभेद विसरून आम्ही व्यापक महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत.'' असेही मुख्यमंत्र्यांवी संगितले.''
दरम्यान, शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या दिलजमाईमुळे तुम्ही, उद्धवजी, अमित शहा हे एकत्र आलात, या चित्रपटाचे कथानक आम्हाला ऐकायचे आहे, अशी गुगलीही रितेश देशमुखने मुख्यमंत्र्यांसमोर टाकली. अन् मुख्यमंत्र्यांनीही त्याला तितकेच अनपेक्षित उत्तर दिले. ''मातोश्रीवर आम्ही गेलो तेव्हा रश्मी वहिनींनी आम्हावा वडे आणि खिचडी खावू घातली. त्यामुळे आम्हाला चर्चेला मार्गच राहिला नाही आणि युतीचा प्रश्न मार्गी लागला,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.