LMOTY 2019 : या 'लेडी सिंघम'ने  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार शहिदांना केला समर्पित 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 08:05 PM2019-02-20T20:05:35+5:302019-02-21T15:31:24+5:30

मर्दानीने हा पुरस्कार पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना समर्पित केला आहे. 

LMOTY 2019: The 'Lady Singham' dedicated the 'Lokmat Maharashtrian of the Year' award to martyrs | LMOTY 2019 : या 'लेडी सिंघम'ने  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार शहिदांना केला समर्पित 

LMOTY 2019 : या 'लेडी सिंघम'ने  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार शहिदांना केला समर्पित 

googlenewsNext
ठळक मुद्देयंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं या त्यांना गौरवण्यात आलं आहे.मुंबईत वरळी येथील भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात आयपीएस अधिकारी एन. अंबिका यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मुंबई - अतिशय सक्षमपणे मुंबईच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या एन. अंबिका. मुंबई पोलीस दलातील 'लेडी सिंघम' म्हणून त्या ओळखल्या जातात. भारतीय पोलीस सेवा दलातील (आयपीएस) जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी एन. अंबिका  यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं या त्यांना गौरवण्यात आलं आहे. मात्र, या कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकारी असलेल्या लेडी सिंघम, मर्दानीने हा पुरस्कार पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना समर्पित केला आहे. 

मुंबईत वरळी येथील भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात आयपीएस अधिकारी एन. अंबिका यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तामिळनाडूत जन्मलेल्या मला महाराष्ट्रातील लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे हा पुरस्कार मिळाला असून त्यांचे मी आभारी असल्याचं एन. अंबिका यांनी म्हटलं. तसेच नुकत्याच पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अंबिका यांनी आज मिळालेला पुरस्कार शहिदांना समर्पित केला आहे.  

LMOTY 2019: IPS अधिकाऱ्यांना 'लोकमत'चा सलाम;  एन. अंबिका, हर्ष पोद्दार ठरले 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

Web Title: LMOTY 2019: The 'Lady Singham' dedicated the 'Lokmat Maharashtrian of the Year' award to martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.