LMOTY 2022: आपने टीसीएस बनाई, मैं क्या कर सकता हूँ? लेन्सकार्टच्या मालकांनी घेतल्या टाटा अध्यक्षांकडून टिप्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 07:56 AM2022-10-14T07:56:47+5:302022-10-14T07:57:06+5:30

Lokmat Maharashtrian of the year awards 2022: कार्यक्रमाला राज्य सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ उपस्थित होते. त्याशिवाय विविध पक्षांचे ३० ते ३५ आमदार, केंद्रीय मंत्री आणि प्रशासनातील जवळपास ७० ते ८० अधिकारी यांची उपस्थिती कार्यक्रमात लक्षवेधक ठरली. 

LMOTY 2022: You made TCS, what can i do? Lenskart owners take tips from Tata president n chandrasekaran | LMOTY 2022: आपने टीसीएस बनाई, मैं क्या कर सकता हूँ? लेन्सकार्टच्या मालकांनी घेतल्या टाटा अध्यक्षांकडून टिप्स...

LMOTY 2022: आपने टीसीएस बनाई, मैं क्या कर सकता हूँ? लेन्सकार्टच्या मालकांनी घेतल्या टाटा अध्यक्षांकडून टिप्स...

googlenewsNext

‘तुम्ही टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेससारखी प्रचंड मोठी कंपनी एकहाती उभी केलीत, मी माझ्या कंपनीसाठी काय करू शकतो?’ - असा सवाल पुरस्कार स्वीकारल्यानंतर लेन्सकार्टचे संस्थापक पीयूष बन्सल यांनी टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष एन. चंद्रसेकरन यांना केला. 

यंग हूँ, क्या कर सकता हूँ? - असं विचारणाऱ्या  बन्सल यांना एन. चंद्रा म्हणाले,  ‘महत्त्वाकांक्षा महत्त्वाची! ती जिवंत असली आणि आपलं ध्येय नेमकं किती उंच आहे, याचा अंदाज असला की सगळं नीट होतं! महत्त्वाकांक्षा, स्वप्नं, ध्येय हे सगळं फुकट तर असतं... इट्स फ्री! फक्त या गोष्टी तुमच्या मनात ठाण मांडून असल्या पाहिजेत!’- हे सांगत असताना एन. चंद्रा यांनी एका सुप्रसिद्ध वाक्याचा दाखलाही दिला : नेव्हर वरी दॅट  आय विल नेव्हर अचिव्ह माय गोल, माय ओन्ली वरी इज दॅट  आय मे कीप माय गोल शॉर्ट!

आमदार, खासदार, मंत्र्यांची मांदियाळी
कार्यक्रमाला राज्य सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ उपस्थित होते. त्याशिवाय विविध पक्षांचे ३० ते ३५ आमदार, केंद्रीय मंत्री आणि प्रशासनातील जवळपास ७० ते ८० अधिकारी यांची उपस्थिती कार्यक्रमात लक्षवेधक ठरली. 

दोन वर्षांनंतर चंद्रसेकरन यांची मुलाखत
टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रसेकरन यांनी दोन वर्षांनंतर पहिल्यांदा प्रदीर्घ मुलाखत दिली ती फक्त लोकमतला..! त्यांच्या मुलाखतीकडे उद्योग जगताचे लक्ष लागले होते. समारंभाच्या ठिकाणी अनेक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रसेकरन काय माहिती देतील, याकडे ते लक्ष देऊन होते. चंद्रसेकरन सहकुटुंब कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन तास थांबले होते.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२ चे विजेते
लोकसेवा समाजसेवा     : डॉ. नंदकुमार आणि आरती पालवे 
    (पळसखेड सपकाळ, जि. बुलढाणा)
शिक्षक     : बालाजी जाधव 
    (जि.प. शाळा, विजयनगर, ता. माण, जि. सातारा)
क्रीडा     : अवंतिका नराळे (धावपटू, पुणे)
वैद्यकीय - राज्य     : डॉ. ऋषिकेश ठाकरे (बालरोगतज्ज्ञ, औरंगाबाद)
वैद्यकीय - मुंबई     : डॉ. मंदार नाडकर्णी (कर्करोग, शल्यचिकित्सक) 
इनोव्हेटर इन अ‍ॅग्रीकल्चर     : मिथिलेश देसाई 
    (झापडे, लांजा, रत्नागिरी) (बी के टी पुरस्कृत)
उद्योग     : अमन मेहतानी (एडीएम ग्रुप, पुणे)
आयएएस (प्रॉमिसिंग)     : डॉ. विपिन इटनकर (जिल्हाधिकारी, नागपूर)
आयएएस (प्रॉमिसिंग)     : पवनीत कौर (जिल्हाधिकारी, अमरावती)
आयपीएस (प्रॉमिसिंग)     : अंकित गोयल (जिल्हा पोलीस प्रमुख, गडचिरोली)
आयपीएस (प्रॉमिसिंग)     : मनोज पाटील (जिल्हा पोलीस प्रमुख, अहमदनगर)
सीएसआर     : मुकुल माधव फाउंडेशन 
    (फिनोलेक्स इंडस्ट्री लिमिटेड)
राजकारण (प्रॉमिसिंग)     : आ. डॉ. राहुल पाटील 
    (शिवसेना उद्धव ठाकरे गट, परभणी) 

विशेष पुरस्कार 
मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन     : एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन     : देवेंद्र फडणवीस 
    (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
मोस्ट इम्पॅक्टफुल पॉलिटिशियन     : जितेंद्र आव्हाड 
    (माजी गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस) 
व्हिजनरी इंडस्ट्रियलिस्ट     : एन. चंद्रसेकरन, अध्यक्ष, टाटा सन्स
एंत्राप्रुन्यूर     : पीयूष बन्सल (संस्थापक, लेन्सकार्ट) 
अभिनेता (पुरुष)     : रणवीर सिंग 
अभिनेत्री (स्त्री)    : कियारा अडवाणी 
विश्वविख्यात कलाकार     : सुजाता बजाज

Web Title: LMOTY 2022: You made TCS, what can i do? Lenskart owners take tips from Tata president n chandrasekaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.