LMOTY 2023: उपचारांसोबत विद्यार्थी घडविण्याचे काम! डॉ. प्रज्ञा चंगेडे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 06:13 PM2023-04-26T18:13:11+5:302023-04-26T18:46:28+5:30

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला.

LMOTY 2023: Making students work with medical Practice! Lokmat Maharashtrian of the Year awards 2023 to Dr. Pradnya Changede | LMOTY 2023: उपचारांसोबत विद्यार्थी घडविण्याचे काम! डॉ. प्रज्ञा चंगेडे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

LMOTY 2023: उपचारांसोबत विद्यार्थी घडविण्याचे काम! डॉ. प्रज्ञा चंगेडे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

googlenewsNext

मुंबई : राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. वैद्यकीय / मुंबई या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळाले होते. यंदा म्हणजेच २०२३ चा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे डॉ. प्रज्ञा चंगेडे (Dr. Pradnya Changede, Gynaecologist, Medical Mumbai) ह्या या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. डॉ. प्रशांत पाटील - पेडियाट्रिक्स इंडोक्रायनोलॉजिस्ट - एस. आर. सी. सी. हॉस्पिटल हे या पुरस्काराचे उपविजेचे ठरले.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले. 

उपचारांसोबत विद्यार्थी घडविण्याचे काम
सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या प्रसूतीतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा चंगेडे अवघडलेल्या महिलांची सुखरूप सुटका करणे, गर्भवती महिलांची प्रसूती, आणि लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना घडवणे या जबाबदाऱ्या गेल्या १४ वर्षांपासून समर्थपणे पेलतात. त्या गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या विषयावरही काम करत आहेत. दिवसाला ४० ते ५० महिलांच्या सर्व्हायकल कॅन्सर या आजाराचे निदान करण्यासाठी येतात तेव्हा डॉ. चंगेडे त्यासाठी लागणारी पॅप स्मिअर चाचणी करतात. त्यानंतर त्या उपचाराची दिशा ठरवतात. सायन रुग्णालयात त्या आठवड्याला २५ ते ३० प्रसूती करतात. त्यात १० ते १२ सिझेरियन शस्त्रक्रिया असतात. वैद्यकीय विश्वातील प्रतिष्ठित स्त्रीरोगविषयावरील 'द जर्नल ऑफ ओब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी ऑफ इंडिया' या नियतकालिकात सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. दोन रुग्णांमध्ये त्यांनी साडेचार किलो वजनाच्या गाठी काढून शस्त्रक्रिया केल्या आहेत.

Read in English

Web Title: LMOTY 2023: Making students work with medical Practice! Lokmat Maharashtrian of the Year awards 2023 to Dr. Pradnya Changede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.