LMOTY 2023: हृदयविकारापासून वाचविणारे! डॉ. अमेय बिडकर यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 06:06 PM2023-04-26T18:06:12+5:302023-04-26T18:08:24+5:30

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला.

LMOTY 2023: Saving Heart Attacks Before time! Lokmat Maharashtrian of the Year awards 2023 to Dr. Amey Bidkar | LMOTY 2023: हृदयविकारापासून वाचविणारे! डॉ. अमेय बिडकर यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

LMOTY 2023: हृदयविकारापासून वाचविणारे! डॉ. अमेय बिडकर यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

googlenewsNext

मुंबई : राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. वैद्यकीय / उर्वरित राज्य या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळाले होते. यंदा म्हणजेच २०२३ चा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे डॉ. अमेय बिडकर (Dr. Amey Arun Beedkar, Interventional Cardiologist, Nagpur Medical (Rest of Maharashtra)) हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले. 

बायोडिग्रेडेबल स्टेंट भारतात वाढवायच्या
डॉ. अमेय बिडकर यांनी हृदयविकाराचे समाजातील प्रमाण कमी होण्यासाठी हिमोहार्ट फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणे हे त्यांचे जीवनध्येय आहे. त्यासाठी शाळकरी मुलांपासून प्रत्येकासाठी हृदयाची काळजी आणि अचानक हृदयविकार आला तर काय करावे? असे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत दहा हजारांपर्यंत लोकांना शिक्षित केले आहे. बायोडिग्रेडेबल स्टेंटचा भारतात प्रसार व्हावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ही स्टेंटची नवीन पिढी आहे. या स्टेंटसह अँजिओप्लास्टी सहसा कुणी करत नाही. शरीरात कायमस्वरूपी राहणाऱ्या पारंपरिक धातूच्या स्टेंटहूनही वेगळी स्टेंट आहे. कार्डिओलॉजीच्या क्षेत्रात यामुळे क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. ही बायोडिग्रेडेबल स्टेंट कोरोनरी आर्टरी विकारामध्ये उत्कृष्टता प्रदान करत असल्याने भविष्यात अधिकाधिक वापरली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय नियतकालिकात २०पेक्षा जास्त संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत.

Web Title: LMOTY 2023: Saving Heart Attacks Before time! Lokmat Maharashtrian of the Year awards 2023 to Dr. Amey Bidkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.