LMOTY2024 :'चार सौ पार' कसं जमवणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'पॉलिटिकल केमिस्ट्री'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 09:16 PM2024-02-15T21:16:42+5:302024-02-15T21:29:17+5:30

LMOTY2024 And Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी 'चार सौ पार' कसं जमवणार? हे सांगताना 'पॉलिटिकल केमिस्ट्री' सांगितली आहे.

LMOTY2024 Devendra Fadnavis said 'Political Chemistry' Over 400 seats | LMOTY2024 :'चार सौ पार' कसं जमवणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'पॉलिटिकल केमिस्ट्री'

LMOTY2024 :'चार सौ पार' कसं जमवणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'पॉलिटिकल केमिस्ट्री'

प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. यंदाही हा पुरस्कार सोहळा रंगला. याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महामुलाखत' लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि संपादक अतुल कुलकर्णी यांनी घेतली. 

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी 'चार सौ पार' कसं जमवणार? हे सांगताना 'पॉलिटिकल केमिस्ट्री' सांगितली आहे. "फक्त मोदीजी म्हणतात असं नाही तर खरगे साहेब देखील असं म्हणत आहेत, अब की बार 400 पार. म्हणजेच जेवढा कॉन्फिडन्स मोदीजींना आहे तेवढाच खरगे साहेबांना देखील आहे. 2024 ची निवडणूक ही पॉलिटिकल केमिस्ट्रीची निवडणूक आहे. पॉलिटिकल अर्थमॅटीकमध्ये वन प्लस वन हे टू होतं. पॉलिटिकल केमिस्ट्रीमध्ये वन प्लस वन हे इलेव्हन होतं आणि ही ती केमिस्ट्री आहे. मोदीजींना हे दिसत आहे."

"आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता देखील हे फील करत आहे. कोणत्याही चौकात दहा माणसांना विचारलं तर सात माणसं म्हणतील आम्ही मोदीजींना वोट करणार आहे, ही केमिस्ट्री तयार झाली आहे. मोदीजींचं सर्वात मोठं यश म्हणजे त्यांचं थेट कम्युनिकेशन हे समाजातील सर्व घटकांशी आहे. यावेळचं मतदान हे पॉलिटिकल केमिस्ट्रीने होणार आहे" असं देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं आहे. 

राज ठाकरे आमचे चांगले मित्र; मनसेसोबतच्या युतीबद्दल फडणवीस यांची 'राज की बात'

देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत "राज ठाकरे आमचे चांगले मित्र" असं म्हणत मनसेसोबतच्या युतीबद्दल 'राज की बात' सांगितली आहे. राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. या महायुतीत मनसे कुठे असेल? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "आता मनसे कुठे असेल हे तर आपल्याला वेळ सांगेल. आमची राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे. आमच्या भेटीगाठी होतात. आम्ही अनेक विषयांवर गप्पा देखील मारतो. काही चांगल्या सूचना ते अनेकवेळा करतात. तर कधी आमच्यावर टीका देखील करतात. सोबत काम करू की नाही हे आता लवकरच आपल्याला समजेल. अजून असा काही निर्णय घेतलेला नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

 

 

Web Title: LMOTY2024 Devendra Fadnavis said 'Political Chemistry' Over 400 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.