लोडशेडिंगमुळे राज्यात कोट्यवधींचा फटका, मराठवाड्यात नऊ तास वीज गायब, उत्पादन झाले ठप्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 05:48 AM2017-09-13T05:48:30+5:302017-09-13T05:48:30+5:30

कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती संच बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. रविवारपासून ५ ते ९ तासांपर्यंत भारनियमन (लोडशेडिंग) सुरू झाले आहे. परिणामी उद्योग बंद ठेवायची पाळी उद्योजकांवर आली असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतीपंपही बंद झाले आहेत.

Load shedding affects hundreds of millions of crores of rupees in the state, production of nine hours in Marathwada goes missing | लोडशेडिंगमुळे राज्यात कोट्यवधींचा फटका, मराठवाड्यात नऊ तास वीज गायब, उत्पादन झाले ठप्प  

लोडशेडिंगमुळे राज्यात कोट्यवधींचा फटका, मराठवाड्यात नऊ तास वीज गायब, उत्पादन झाले ठप्प  

Next

मुंबई : कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती संच बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. रविवारपासून ५ ते ९ तासांपर्यंत भारनियमन (लोडशेडिंग) सुरू झाले आहे. परिणामी उद्योग बंद ठेवायची पाळी उद्योजकांवर आली असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतीपंपही बंद झाले आहेत.
मराठवाड्यात तब्बल नऊ तास वीज गायब झाल्याने औरंगाबादमधील प्रमुख एमआयडीसींसह सर्वच उद्योगांमधील उत्पादन बंद झाले आहे. राज्याला सध्या १५ हजार मेगावॅट विजेची गरज आहे. पण १४ हजार १०० मेगावॅट वीजनिर्मिती होत असून ९०० मेगावॅटचा तुटवडा असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मात्र वस्तुस्थिती वेगळी असून दीड हजार मेगावॅटहून अधिक तुटवडा भासत आहे.
सोमवारपासून मराठवाड्यातील वीजनिर्मिती कंपन्यांकडून महावितरणला विजेचा पुरवठा कमी झाल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले. विदर्भात नागपूर, यवतमाळ, गोंदिया, अमरावती व अकोला जिल्ह्यांमध्ये मोठे लोडशेडिंग सुरू आहे.
पुणे जिल्हा व उद्योगनगरी पिंपरी चिंचवडलाही फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४० टक्के भागात भारनियमन सुरू आहे. सांगली जिल्ह्यात सरासरी दोन तास, सातारा जिल्ह्यात वसुली रखडलेल्या गावांना व सिंधुदुर्गलाही भारनियमनाचे चटके बसले आहेत. नाशिक व खान्देशातही अशीच स्थिती आहे.

शेतीचे पाणीही झाले बंद
जून, जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर आॅगस्टमध्ये चांगला पाऊस झाला. जलाशये भरली, मात्र आता विजेअभावी शेतीला पाणी देणे अवघड झाले आहे.

सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर ‘हीट’
सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यातच आॅक्टोबर हीट जाणवत आहे. विजेअभावी मात्र हा उकाडा असह्य झाला आहे. ग्रामीण भागांत नऊ तर शहरी भागांत सहा तासांपर्यंत भारनियमन सुरू आहे.

कोयनेतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती
कोयना धरणाच्या टप्पा एक, दोन, तीन, चारमधून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी दिली.

15328 मेगावॅट विजेची गरज

14812 मेगावॅट वीज उपलब्ध

516 मेगावॅट विजेची तूट

असे आहे लोडशेडिंग

विभाग तास
मराठवाडा : ९
विदर्भ : ४ ते ८
प. महाराष्ट्र : ३ ते ५
उत्तर महाराष्ट्र : ३ ते ५
कोकण : ४ ते ५

 

 

Web Title: Load shedding affects hundreds of millions of crores of rupees in the state, production of nine hours in Marathwada goes missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार