पंतप्रधानांच्या भाषणाला लोडशेडींगचा फटका!

By Admin | Published: September 5, 2014 11:19 PM2014-09-05T23:19:35+5:302014-09-05T23:19:35+5:30

देशातील प्रत्येक घरात वीज देण्याची घोषणा करणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षक दिनी होणा:या भाषणाला ठाणो-पालघर जिल्ह्यात मात्र लोडशेडींगचा फटका बसला.

Loaded shading of Prime Minister's speech! | पंतप्रधानांच्या भाषणाला लोडशेडींगचा फटका!

पंतप्रधानांच्या भाषणाला लोडशेडींगचा फटका!

googlenewsNext
शिक्षक - विद्याथ्र्याची मेहनत वाया : गणोशोत्सवाच्या सुट्टीमुळे विद्यार्थी नाहीत; सकाळच्या सत्रतही विद्याथ्र्याचा अभाव
सुरेश लोखंडे - ठाणो 
देशातील प्रत्येक घरात वीज देण्याची घोषणा करणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षक दिनी होणा:या भाषणाला ठाणो-पालघर जिल्ह्यात मात्र लोडशेडींगचा फटका बसला. महाराष्ट्रातील वीजेच्या टंचाईला मोदी हेच जबाबदार आहेत, या मुख्यमंत्र्याच्या आरोपाला दोन दिवस नाहीत तोच याच वीज टंचाईमुळे जिल्ह्यातील लाखो-विद्याथ्र्यासह हजारो शिक्षकांना मात्र पंतप्रधानाच्या भाषणाला मुकावे लागले. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी पाडय़ांतील शाळांमध्ये चिखल तुडवून दूरदर्शन संचाची सोय करणा:या शिक्षक-विद्याथ्र्याची मेहनत मात्र वाया गेली.
 शिक्षणाची महती स्पष्ट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरचित्रवाणीवरील भाषण शहरी भागातील विद्यार्थी  व शिक्षक यांना सहज ऐकणो व पहाणो शक्य झाले. पण ग्रामीण, आदिवासी,  दुर्गम भागात बहुतांशी ठिकाणी उद्भवलेल्या लोडशेडींगसह कमी-अधीक नेटवर्कचा फटका त्याला बसला आहे. त्यातच गणोशोत्सवाचे औचित्य साधून  जिल्हा परिषदेच्या 3,785 शाळांना पाच दिवसाची सुटी होती. यामुळे शिक्षक दिनी या शाळांचा पहिला दिवस असल्यामुळे विद्याथ्र्याची उपस्थिती देखील कमी होती. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी या तालुक्यातील शहरी भागाला लागून असलेल्या गावपाडय़ांमधील शाळांमध्ये टिव्ही संच उपलब्ध झाल्यामुळे दुपारी 2.3क् वाजेच्या दरम्यान विद्याथ्र्यानी पंतप्रधानांच्या भाषण ऐकले.  टिव्ही उपलब्ध न झालेल्या शाळेचे विद्याथ्र्यानी गावातील काही घरांमध्ये जाऊन भाषण ऐकले. खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या विद्याथ्र्याना तर त्यांच्या वर्गातच बसून टिव्हीवरील पंतप्रधानांच्या भाषणाचा आस्वाद घेता आला. परंतु काही शाळा सकाळच्या सत्रत असल्यामुळे त्यांतील विद्याथ्र्याना भाषण ऐकणो शक्य झाले नाही.
अंबरनाथ तालुक्यातील कुडेरान, नंबरवाडीतील विद्युत पुरवठय़ा अभावी येथील शाळांमधील विद्याथ्र्याना भाषण ऐकण्याची संधी मिळाली नाही. मो:याचा पाडा येथील विद्याथ्र्यानी शाळेच्या  टिव्हीसंचवर तर कान्होर येथील विद्याथ्र्यानी लॅपटॉपवर पंतप्रधानांचे भाषण ऐकले. भाईंदर येथील आवर लेडी ऑफ नाझरेथ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने तर शुक्रवारी  विद्याथ्र्याना सुटीच दिली होती.  तर  कल्याणजवळील चिकणघर येथील महापालिकेची शाळा तर बंद होती. तर गौरीपाडा येथील संत एकनाथ प्राथमिक शाळेच्या विद्याथ्र्यानी एकाच्या घरात बसून भाषण ऐकले. याशिवाय सोनारपाडा येथील जिल्हा परिषदेची शाळा सुरू असणो अपेक्षित असताना तीला देखील  कुलूप लावलेले असल्याचे प्रत्येक्षदर्शी ग्रामस्थांनी नमुद केले आहे. 
शहापूर तालुक्यातील भातसानगर येथे विद्युत पुरवठय़ा अभावी प्रकल्प विद्यालयासह जिल्हा परिषद शाळा कुकांबे, साजिवली, लाहे येथील शाळांमध्ये दूरचित्रणवाणीवरील भाषण   पहाता आले नाही. तर खुटघर येथे लाईट असतानाही येथील शाळेत वीज कनेक्शन नसल्यामुळे विद्याथ्र्याना एकत्र बसून भाषण ऐकण्याची संधी मिळाली नाही. सारमाळ येथील शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिका:यांनी टीव्ही संच उपलब्ध करून दिल्यामुळे विद्याथ्र्यानी एकत्र बसून भाषण ऐकले. शहापूर येथील म.ना. बरोरा माध्यमिक शाळेतील विद्याथ्र्यानी देखील भाषण ऐकले.  याशिवाय वासिंद, साणो, पाली, पिंजपाडा, दहागांव, रायकरपाडा, देसलेपाडा आणि ब्राrाणपाडायेथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्याथ्र्यानी देखील भाषण ऐकल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. 
ज्या शाळांना शिक्षक दिनी भाषण दाखवता येणार नाही, त्यांनी 1क् सप्टेंबर्पयत त्याचे प्रसारण करण्याचे शिक्षण सचिवानी सुचित केले आहे. त्यात दिरंगाई केली तरी  कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नसल्यामुळे बहुतांशी शाळांनी पंतप्रधानांचे भाषण गांभीर्याने घेतले  नसल्याचे निदर्शनात आले आहे. 
 
जिल्ह्यातील 1क्7 शासकीय आo्रम शाळांसह जिल्हा परिषदेच्या 3,785 शाळा, नगरपालिकेच्या 41, महापालिकांच्या 467 आणि अनुदानीत शाळा एक हजार 192 शाळांप्रमाणोच सुमारे एक हजार  6क्क् माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी - शिक्षकाना या भाषणाचा लाभ घणो शक्य होते. परंतु, बहुतांशी  शाळांच्या  कार्यक्षेत्रत वीजेच्या लोडशेडींगसह इंटरनेट कनेक्ट होत नसल्याचा फटका देखील या भाषणाला बसला आहे. ठाणो महापालिकेच्या आदिवासी पाडय़ांतील शाळांना तर अनेक ठिकाणी टाळेच होते.
 
मोदीसरांच्या भाषणाला ठाण्यात विद्याथ्र्याच्या दांडय़ा
नामदेव पाषाणकर ल्ल घोडबंदर 
शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी शालेय विद्याथ्र्याशी संवाद साधत असताना त्यांचे भाषण सर्व शाळांतील विद्याथ्र्यानी ग्रहण करण्याचे आदेश देण्यात आले होते. असे आदेश ठाणो महापालिका शिक्षण मंडळाला प्राप्त झाले खरे मात्र या आदेशाकडे बहुसंख्य विद्याथ्र्यासह अनेक शाळांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून ठाणो महापालिका दरवर्षी साजरा करीत असते. यावर्षीही गडकरी रंगायतनमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सकाळी 9 वाजेपासून दुपारी 2 र्पयत शिक्षक कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. शाळेमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण विद्याथ्र्याना ऐकविण्यासाठी शिक्षकांनी वर्गात दूरचित्रसंच, रेडीओ, इंटरनेटद्वारे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची सोय करण्याचे सुचविण्यात आले होते. हा आदेश ऐन गणपतीच्या सुट्टीमध्ये आल्यामुळे विद्याथ्र्याना शाळेत कसे उपस्थित करायचे असा गंभीर सवाल शिक्षकांना पडला असताना काही शिक्षकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या काही पालकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून मुलांना शाळेत धाडण्याचे संदेश दिले. 
तसेच त्या विद्याथ्र्याकडून त्यांच्या 
वर्गमित्रंना निरोप देण्यात आले. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचा शिक्षकांसाठी कार्यक्रम असल्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात येते. हे विद्याथ्र्याना माहित असल्यामुळे विद्याथ्र्यानी शाळेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
अशा अवस्थेतही शिक्षकांनी दूरचित्रसंच शाळेत लावण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शाळेत डीश अॅन्टेना किंवा केबलची व्यवस्था नसल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला व शाळांमध्ये दूरचित्रवाणी संचाची व्यवस्था होऊ शकली नाही. त्याएवजी रेडिओ व इंटरनेटद्वारे पंतप्रधान मोदीचे भाषण ऐकवण्याचा व दाखविण्याचा प्रयत्न काही शिक्षकांनी केला.
 
लोक शिक्षकांचा सत्कार
अनाथ म्हणून वाढत असतांनाच कल्याण रेल्वे स्टेशनवर मोलमजुरी करणा:या 12 ते 18 वयोगटातील तरुणांना रेल्वे फलाटावरच शिकवून शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणा:या तीन समाज कार्यकत्र्याचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून गौरव करण्यात आला. राष्ट्र सेवा दलाच्या कल्याण-डोंबिवली विभागातर्फे सुभाष कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूर्यकांत कोळी, विशाल कुंटे, विशाल यादव अशी या तीन कार्यकत्र्याची नावे आहेत. स्वत:चे महाविद्यालयातील शिक्षण व्यवसाय सांभाळून गेले दोन वर्षे हे काम कोणताही मोबदला न घेता करीत आहेत.
 
जिप शाळांमध्ये ‘नमो’ भाषणास विद्यार्थी, शिक्षकांचा प्रतिसाद
मुरबाड : माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी देशभरासह मुरबाड तालुक्यातील म्हसा, टोकावडा, शिवळे, शिरोशी, कोरावळे, धसई, सरळगाव, तुळई, मुरबाड या प्रमुख विभागातील 35क् जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक 4क् शाळांमध्ये भाषण प्रत्यक्षात दूरध्वनी, मोबाईल, रेडीओवर ऐकविले असता त्यास विद्यार्थी व शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
 
बोईसरच्या विद्याथ्र्यानी मंत्रमुग्धतेने ऐकले भाषण
देशाचे उद्याचे भविष्य ज्या विद्याथ्र्याच्या हाती आहे त्या विद्याथ्र्यानी पंतप्रधानांचे विचार ऐकणो गरजेचे होते त्याकरीता बोईसर येथील सिडको कॉलनीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वर्ग आणि शाळा व्यवस्थापन समितीने मोठा प्रोजेक्टर शाळेमध्ये लावला होता. त्यावेळी मंत्रमुग्धपणो विद्याथ्र्यानी पंतप्रधान नरेंद्र मोंदीचे भाषण ऐकले.
 
काही शाळांना टाळे तर काही ठिकाणी रेडिओची सोय
लोकमत प्रतिनिधीने वागळे इस्टेटमधील ठाणो मनपाच्या 12 शाळांना भेट देऊन परिस्थितीचे निरीक्षण केले असता शांतीनगरमध्ये असलेल्या शाळा क्रमांक 42, 1क्5, 111, 38, 127 या शाळांपैकी फक्त हिंदी माध्यमांचे शाळा क्रमांक 127 मधील 348 विद्याथ्र्यापैकी अंदाजे 15क् विद्यार्थी उपस्थित होते. आणि त्यांच्यासाठी एका रेडिओची सोय करण्यात आली होती. तर उर्वरित 42,1क्5,111 क्रमांकाच्या शाळांना टाळे लावल्याचे दिसले. 38 क्रमांकाच्या शाळेत कुठचीही व्यवस्था झाली नसल्याने हजर राहिलेल्या 1क् ते 12 विद्याथ्र्याना शाळेतून सोडून देण्यात आले.
 
इंटरनेटद्वारे ऐकले भाषण
च्किसननगर नंबर तीन येथे असलेल्या शाळा क्रमांक 23, 1क्2,1क्3, 33,21 या शाळांचा पट जवळपास 16क्क्च्या वर असताना जेमतेम शंभर विद्यार्थी जमा करण्यास शिक्षकांना यश मिळाले. 
च्माध्यमिक शाळेत उपस्थित राहिलेल्या विद्याथ्र्यासाठी इंटरनेटद्वारे संगणकावर भाषण ऐकण्याची सोय करण्यात आली होती. 
च्मुख्याध्यापक कक्षात जेमतेम 3क् ते 35 मुले बसण्याची सोय असल्यामुळे उर्वरित मुलांना हे भाषण ऐकण्यासाठी अडचण निर्माणा झाली.हाजुरी येथील शाळा क्रमांक 122 व 39 या शाळांना टाळे लावल्याचे दिसले त्यामुळे येथे भाषण ऐकवण्यात आलेच नाही. 
 
इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा बहिष्कार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शिक्षण दिनाच्या पाश्र्वभुमीवर शिक्षण क्षेत्रला मार्गदर्शन करताना विद्याथ्र्याशी दुरदर्शनच्या माध्यमातुन थेट संवाद साधला. यावेळी पालघरमधील ग्रामीण भागातील शाळाच्या विद्याथ्यार्ंमध्ये उत्सुकता असली तरी काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकीत शाळा लवकर सोडल्याचे दिसून आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधुन देशभरातील शाळांमधील विद्यार्थी शिक्षकांना पंतप्रधान मार्गदर्शन करणार असल्याने पालघर ग्रामीण भागातील शाळामध्ये मोठी उत्सुकता होती. पुर्व भागातील नवली, वेवुर मधील जिल्हा परिषद शाळा तर स. दु. कदम जीवन विकास शाळेमध्ये पडद्यावर पंतप्रधानांचे भाषण थेट प्रसारीत झाले होते. शिक्षकाशिवाय जीवनात परिवर्तन घडु शकत नाही. हे सांगत असतानाच शिक्षणाचे महत्व समजुन घ्या तसेच ग्रामीण शहरी भागातील प्रत्येक सुशिक्षित नागरीकांनी एक तास शाळांमध्ये शिकवावे असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
मोदींची भाषणासंदर्भात विद्याथ्र्यांमध्ये उत्सुकता असली तरी काही इंग्रजी माध्यामाच्या शाळांनी शिक्षण विभागाचा प्रस्ताव फेटाळून लावीत शाळा लवकर सोडून दिल्याने शाळामधील विद्याथ्र्याना मोदींचे भाषण शाळामधून ऐकता आले नाही. अशावेळी काही विद्यार्थी व त्यांचे पालकांनी शाळा विरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची चर्चा होती परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे यांनी अशी कुठली तक्रार आमच्याकडे आली नसल्याचे सांगितले. 
 
अडीच लाख 
विद्याथ्र्यानी ऐकले भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्याथ्र्याशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमाला वसई-विरार उपप्रदेशातील सुमारे 35क् शाळांमधील अडीच लाख विद्याथ्र्यानी चांगला प्रतिसाद दिला. ग्रामीण भागात जेथे वीज नाही त्या गावात रेडीओच्या माध्यमातुन हे भाषण विद्याथ्र्याना ऐकवण्यात आले. प्रत्येक शाळेमध्ये दुरचित्रवाणी तसेच रेडीओच्या माध्यमातुन हे भाषण ऐकवण्यासाठी वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने 2 दिवसापासून तयारी चालवली होती. अनेक शाळांमध्ये दुरचित्रवाणी संच लावण्यात आले. जेथे संच नव्हते तेथे भाडेतत्वावर संच लावले होते. 

 

Web Title: Loaded shading of Prime Minister's speech!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.