हलका झाला पोस्टाचा भार

By admin | Published: July 12, 2014 11:15 PM2014-07-12T23:15:41+5:302014-07-12T23:15:41+5:30

ऑनलाईन प्रणालीचा परिणाम

Loads of lightest posts | हलका झाला पोस्टाचा भार

हलका झाला पोस्टाचा भार

Next

कारंजालाड : केन्द्र अथवा राज सरकारच्या अखत्यारितील विविध विभागाच्या नोकरी भरतीसाठी ऑनलाईन प्रणालीचा उपयोग होत असल्याने पोस्ट विभागाच्या खात्यावरील ताण कमी झाला आहे. नोकर भरतीसाठी अर्ज केल्यानंतर पूर्वी परीक्षेचे प्रवेशपत्र पोस्टमनच्या सहाय्याने उमेदवारास मिळत होते. कधी कधी तर शासनाच्या विभागाच्या नोकरभरतीसाठी जाहिरात निघाल्यानंतर डाक विभागातून अर्ज करावे लागत होते. त्यामुळे पोष्टात पत्रव्यवहारांचे ढिगच ढिग लागत होते. आता मात्र सर्व विभागाची भरती प्रक्रिया ऑनलाईन होत आहे. उमेदवारांना प्रवेश पत्र सुद्धा ई-मेलवर येत आहे. परिणामी पोस्ट खात्याचा भारत कमी झाला असून खाजगी संगणक केन्द्रावरील गर्दी मात्र वाढली आहे.

** सर्वच कामे होतात ऑनलाईन

विविध शासकीय कार्यालयाच्या नोकर भरतीसाठी निघणार्‍या जाहिरातीत अर्ज भरण्याच्या दिनांकापासून अर्ज भरण्याची शेवटची तारीख तसेच बँकेत परीक्षा शुल्क भरण्याच्या तारखा, हॉलतिकीट उमेदवारांच्या मेल आयडीवर येण्याच्या तारखा व परीक्षेच्या तारखात होणार्‍या बदलाबाबत ऑनलाईन व अर्ज बरोबर आहे किंवा नाही हे सर्व वेळेत होताना दिसते.

** पोस्टावरील दोषारोप कमी झाला

पूर्वी बर्‍याच प्रकरणात पोस्टाच्या विलंबामुळे बर्‍याचशा उमेदवारा कॉल लेटर न मिळाल्याने मुलाखतीस अथवा नोकरीस हजर राहता न येण्यासाखी प्रकरणे घडलेली आहेत. त्यामुळे पास्ट खात्याला दोष दिला जात होता. मात्र आता ऑनलाईन पद्धतीमुळे पोस्ट खात्याला दोष देणे आपोआप बंद झाले आहे. तसेच पत्रासाठी अथवा प्रवेश तिकीटासाठी आता नागरिकांना पोस्टमनची सुद्धा वाट पाहावी लागत आहे, हे विशेष.

Web Title: Loads of lightest posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.