शेतक-यांना कजर्मुक्त करा - उध्दव ठाकरे
By admin | Published: May 4, 2016 12:44 PM2016-05-04T12:44:08+5:302016-05-04T12:44:08+5:30
शासनाने शेतक-यांना कर्जावरील व्याजमाफी दिली ही चांगली बाब आह़े परंतु, यंदा पेरण्या झाल्या नाहीत़ त्यामुळे शेतकरी खचला आह़े.
Next
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ४ - शासनाने शेतक-यांना कर्जावरील व्याजमाफी दिली ही चांगली बाब आह़े परंतु, यंदा पेरण्या झाल्या नाहीत़ त्यामुळे शेतकरी खचला आह़े शिवाय, त्याच्यावर कर्जाचा डोंगरही आह़े केंद्र व राज्य शासनाने विचार विनिमय करुन शेतक-यांना एकदाचे कजर्मुक्त कराव़े, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी येथे कले.
शिवसेनेच्या वतीने लातूर शहर व जिल्ह्यात ५० टँकरने मोफत पाणीपुरवठा तसेच तीन हजार पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण उध्दव यांच्या हस्ते बुधवारी लातुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झाल़े याप्रसंगी ते बोलत होत़े दुष्काळ निवारणासाठी शासनाला सूचना करण्यास काही हरकत नाही़ परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसेल तर पावसाळी अधिवेशनात जाब विचारता येईल, असेही उध्दव म्हणाल़े.
मी भाषणासाठी आलेलो नाही, भाषणाने तहान भागत नाही़ मी दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मराठवाडय़ातील जनतेला भेटायला आणि दिलासा द्यायला आलो आह़े भाषणो करणारे दुसरे आहेत़ आम्ही कोरडा दिलासा देत नाही अन दुष्काळावर राजकारणही करत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील ३३ कोटी जनता दुष्काळाच्या खाईत होरपळत आह़े त्यांना या दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न आहेत़ शेतक-यांच्या मुलींचे कन्यादान तसेच जलसंधारणाच्या कामाचा लोकवाटा शिवसेनेने भरलेला आह़े शिवसेना नुसतीच बडबड करीत नाही तर प्रत्यक्ष मदत करुन दुष्काळातून जनतेला सावरण्याचा प्रयत्न करीत आह़े सामाजिक बांधिलकीतून शिवसेनेचे काम सुरु आह़े असे काम कोणता राजकीय पक्ष दुष्काळात करीत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सरकार कुठे कमी पडले त्यावर नंतर बोलू़
गेल्या १३७ वर्षात सर्वात उष्ण वर्ष यंदाचे आह़े. शिवाय, गेल्या सहा वर्षापासून पजर्न्यमान कमी झाल्याने मराठवाडाच काय, राज्यच दुष्काळात होरपळत आह़े हा दुष्काळ निवारण करण्यास सरकार कुठे कमी पडले, यावर नंतर बोलू़ विरोधकांनाही पावसाळी अधिवेशनात बोलता येईल़ पण सध्या दुष्काळातून सावरण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.
विदर्भाकडे महाराष्ट्राचे नेतृत्व
मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राच्या विचारांचा आहे. त्यामुळे स्वतंत्र राज्याची मागणी मराठवाडा करुच शकत नाही़ विदर्भातील चार- दोन लोक वगळले तर संयुक्त महाराष्ट्रच त्यांनाही हवा आह़े सध्या तर विदर्भ महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आह़े मग वेगळे राज्य कशाला हवे, असा सवालही त्यांनी केला.