स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर
By admin | Published: September 12, 2016 04:23 AM2016-09-12T04:23:40+5:302016-09-12T04:23:40+5:30
राष्ट्रीय समाज पक्षाचा राज्यात मोठा विस्तार झाला असून, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदवीधर मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
अहमदनगर : राष्ट्रीय समाज पक्षाचा राज्यात मोठा विस्तार झाला असून, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदवीधर मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यापुढे स्वबळावर लढविणार असल्याचे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कैलास कोळसे व मराठवाडा विभाग अध्यक्ष विष्णू गोरे यांनी सांगितले़
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, मंत्रिपदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी काम सुरू आहे. पक्षाची राज्य कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर ३५ प्रभारी राज्यकार्यकारिणी सदस्यांची निवड केली आहे़ विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागासाठी पाच अध्यक्षांची निवड केली आहे. धनगर आरक्षणासह मराठा आणि मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळावे, अशी आमची भूमिका असून, त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे, असे कोळसे म्हणाले. (प्रतिनिधी)