लोकल प्रवाशांची दुप्पट भाडेवाढीतून अखेर झाली सुटका
By admin | Published: June 25, 2014 03:24 AM2014-06-25T03:24:53+5:302014-06-25T03:24:53+5:30
रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात 100 टक्के भाडेवाढ करणा:या रेल्वे प्रशासनाने मुंबईच्या शहर आणि उपनगरांतील लोकल प्रवाशांना दिलासा दिला आहे.
Next
>मुंबई : रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात 100 टक्के भाडेवाढ करणा:या रेल्वे प्रशासनाने मुंबईच्या शहर आणि उपनगरांतील लोकल प्रवाशांना दिलासा दिला आहे. सेकंड क्लास आणि फस्र्ट क्लासच्या पासच्या दरात 100 टक्के दरवाढ न करता 14.2 टक्केच दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे दुप्पट दरवाढीच्या कात्रीतून सुटका झाली आहे. त्याचप्रमाणो 80 किलोमीटरच्या प्रवासार्पयत सेकंड क्लास प्रवाशांना कुठलीही दरवाढ नसेल, असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 28 जूनपासून नवीन भाडेवाढ लागू होणार असल्याचे रेल्वेकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाकडून 100 टक्के भाडेवाढ करण्यात आल्यामुळे शहर आणि उपनगरांतील धावणा:या लोकल प्रवाशांना मोठा फटका बसला होता. सर्वाधिक संख्या पासधारकांची असल्याने पासधारकांच्या खिशाला मोठी कात्री लागली होती. या निर्णयामुळे फस्र्ट आणि सेकंड क्लासच्या पासची किंमत दुप्पट झाली होती, तर लोकलच्या तिकिटांत पाच रुपयांची वाढ झाली होती. मात्र भरमसाट भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने या दरवाढीचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला होता. अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले, तर महायुतीच्या नेत्यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. 25 जूनपासूनच नवीन भाडेवाढ लागू होणार असल्याने रेल्वे मंत्रलयाने तत्पूर्वीच 24 जूनच्या संध्याकाळी एक परिपत्रक जारी करीत मुंबईकरांना दरवाढीत सूट दिली.
सेकंड क्लास आणि फस्र्ट क्लास प्रवाशांना थोडाफार दिलासा रेल्वेने घेतलेल्या निर्णयातून दिला आहे. रेल्वेने 1क्क् टक्के दरवाढ पासात केली होती. त्यामुळे पासाची किंमत ही दुप्पट झाली होती. मात्र आता फक्त सरसकट 14.2 टक्केच भाडेवाढ या दोन्ही पासधारकांसाठी लागू राहील. त्यामुळे पासचे दर हे दुप्पट होणार नसल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर यांनी सांगितले.
तिकीटधारकांना सूट
सेकंड क्लास तिकीटधारक प्रवाशांना दिलासा देताना 80 किलोमीटर्पयतच्या प्रवासासाठी दरवाढ लागू न करण्याचा निर्णय घेतला. त्यापुढील प्रवासासाठी नियमाप्रमाणो 14.2 टक्के दरवाढ लागू राहील, असे परिपत्रकात नमूद केले. तर फस्र्ट क्लास तिकीटधारक प्रवाशांना सुरुवातीपासूनच 14.2 टक्के दरवाढ लागू असेल, असे सांगण्यात आले.
रेल्वे प्रवास आजपासून महाग
च्रेल्वे भाडेवाढ बुधवारपासून अमलात येत असल्याने रेल्वेचा प्रवास 14 टक्के एवढा महागणार आहे. प्रवास दरवाढीसोबत उद्यापासून सर्वच वस्तूंच्या वाहतुकीचे दर 6.5 टक्क्यांनी वाढणार आहेत. या दरवाढीतून रेल्वेला वर्षाला 8,क्क्क् कोटी रुपये मिळणार आहेत.
च्नवे तिकीटदर आधीच तिकीट काढलेल्या, पण 25 जून किंवा त्यानंतर प्रवास करणा:या प्रवाशांना लागू केले जाणार आहेत. अशा प्रवाशांना पूर्वीचे तिकीटदर आणि 25 जूनपासून लागू होत असलेले नवे तिकीटदर यातील फरकाची रक्कम टीटीई किंवा बुकिंग ऑफिसमध्ये जमा करावी लागणार आहे. प्रवासाच्या आधी ही रक्कम भरावी लागणार आहे.
च्ही दरवाढ मासिक तिकिटावर (एमएसटी) सुद्धा 25 जूनपासून लागू होणार आहे. उपनगरीय आणि बिगर उपनगरीय गाडय़ांचे द्वितीय श्रेणी मासिक तिकीटदर आता यापूर्वीसारखेच 15 वेळा एकदिशा प्रवास याच आधारावर राहतील.
भाडेवाढीआधीच भरघोस कमाई
दरवाढीच्या भीतीने तीन दिवसांपासून प्रवाशांनी पास काढण्यासाठी एकच गर्दी केल्याने भाडेवाढीआधीच रेल्वेने भरघोस कमाई केली. मध्य व पश्चिम रेल्वेने कोटीच्या कोटी उड्डाणो पार केली आहेत.
द्वितीय श्रेणीच्या मासिक पासचे दर
टप्पाजुने भाडे नवीन भाडे
1 ते 20 कि.मी.85 रु.100 रु.
21 ते 45 कि.मी.160 रु.185 रु.
46 ते 70 कि.मी.235 रु.270 रु.
71 ते 100 कि.मी.310 रु. 355 रु.
101 ते 135 कि.मी.385 रु. 440 रु.
136 ते 150 कि.मी.460 रु. 530 रु.