संततधार पावसामुळे लोकल सेवा मंदावली, प्रवाशांचे हाल

By admin | Published: June 27, 2017 07:30 AM2017-06-27T07:30:39+5:302017-06-27T09:57:07+5:30

संततधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा कोलमडली आहे. सायन व कुर्ला स्थानकात ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Local services slow down due to incessant rains, passenger traffic | संततधार पावसामुळे लोकल सेवा मंदावली, प्रवाशांचे हाल

संततधार पावसामुळे लोकल सेवा मंदावली, प्रवाशांचे हाल

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27 - मुंबईची लाईफलाइन समजल्या जाणा-या लोकल सेवेवर पावसामुळे परिणाम झाला आहे.  मध्य रेल्वेवरील वाहतूक तब्बल 40 मिनिटे तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक जवळपास 15 मिनिटे उशिरानं सुरू आहे.  

सायन व कुर्ला स्थानकात ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे तब्बल 40 मिनिटं वाहतूक उशीरानं सुरू असून सीएसटीकडे जाणा-या लोकलचा खोळंबा झाला आहे. 

रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली आहे. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेस मध्य रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे चाकमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  

तर कुर्ला रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाडही झाला आहे. यामुळे धीम्या मार्गावरील लोकल स्थानकात अडकून पडल्या आहेत. सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे मंगळवारी (27 जून ) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकात अचानक तांत्रिक बिघाड झाला असून रेल्वे वाहतूक खोळंबली. ऐन गर्दी आणि कार्यालय गाठण्याच्या वेळेत रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने चाकरमानी हैराण झालेत  

मुंबईसह उपनगरात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू  आहे. हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर मुंबईतील जेव्हीएल परिसरात पावसाचे पाणी साचलं आहे. तर ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. 

(मुसळधार पावसामुळे समुद्राला उधाण)
 
दरम्यान, येत्या २४ तासांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
 

 

 

Web Title: Local services slow down due to incessant rains, passenger traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.