मस्जीद स्टेशनजवळ तीन तरुणांना लोकलने उडविले

By admin | Published: June 27, 2014 02:24 AM2014-06-27T02:24:32+5:302014-06-27T02:24:32+5:30

रेल्वे रुळांवरून आपल्याच धुंदीत चालणा:या तीन मित्रंना लोकलने धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री मस्जीद स्थानकाजवळ घडली.

Locals flushed three youths near the Masjid station | मस्जीद स्टेशनजवळ तीन तरुणांना लोकलने उडविले

मस्जीद स्टेशनजवळ तीन तरुणांना लोकलने उडविले

Next
>एक जण ठार : रुळांवरून चालणो पडले महागात
मुंबई : रेल्वे रुळांवरून आपल्याच धुंदीत चालणा:या तीन मित्रंना लोकलने धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री मस्जीद स्थानकाजवळ घडली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींवर सेन्ट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
सीएसटी रेल्वे पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक चौगुले यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री 8.51 च्या सुमारास मानखुर्द येथील पीएमजी कॉलनीत राहणारे राज रांगणकर, अक्षय मनोटिया व चेतन हे 18 ते 19 वयोगटातील तीन मित्र मस्जीद रेल्वे स्थानक आणि सॅण्डहस्र्ट रोड दरम्यान रुळावरून चालत होते. या तिघांना सीएसटी-कल्याण जलद लोकलने जोरदार धडक दिली. यात तिघेही जखमी झाले व बाजूच्या ट्रॅकवर कोसळले. धडकेनंतर लोकल त्वरित थांबवली. त्यानंतर याच लोकलच्या गार्ड आणि मोटरमनने तिघांनाही लोकलच्या डब्यातून नेले. भायखळा स्थानक आल्यावर स्टेशन मास्तर आणि रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर उपचारासाठी सेन्ट जॉर्ज रुग्णालयात नेले. यातील चेतन याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. राज आणि अक्षयवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Locals flushed three youths near the Masjid station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.