आदिवासी भवनाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले

By admin | Published: December 23, 2016 11:21 PM2016-12-23T23:21:50+5:302016-12-23T23:21:50+5:30

बुटीबोरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात संतप्त पालकांनी गिरीपेठमधील आदिवासी विकास भवनाच्या मुख्य शुक्रवारी सायंकाळी प्रवेशद्वाराला कुलूप

Lock the entrance to the tribal house | आदिवासी भवनाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले

आदिवासी भवनाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - बुटीबोरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात संतप्त पालकांनी गिरीपेठमधील आदिवासी विकास भवनाच्या मुख्य शुक्रवारी सायंकाळी  प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. जोरदार घोषणाबाजी आणि दोषींवर कारवाईची मागणी करून  तब्बल पाच तास अधिकारी आणि कर्मचा-यांना संतप्त जमावाने डांबून ठेवल्यामुळे येथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा पोहचल्यानंतर रात्री १०.१५ वाजता अधिकारी, कर्मचा-यांची सुटका करण्यात आली. 
बुटीबोरी प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी गोंडवाणा यूथ फोर्सचे १०० पेक्षा जास्त कार्यकर्ते शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आदिवासी भवनात धडकले. त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना भेटून या प्रकरणात कारवाई व्हावी, यासाठी निवेदन देण्याचे प्रयत्न केले. मात्र, कोणतेही वरिष्ठ अधिकारी येथे उपलब्ध नसल्याने यूथ फोर्सचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून कर्मचारी, अधिका-यांना आतमध्ये डांबले. त्यानंतर  कार्यकर्ते प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करू लागले. त्यात संतप्त पालकही सहभागी झाले. दुसरीकडे दाराचे कुलूप उघडून घरी जाऊ द्यावे, अशी मागणी करीत आतमधील मंडळी जमावाला विनंती करू लागली. परंतू त्याचा कसलाही परिणाम जमावावर झाला नाही. तब्बल पाच तासांपासून घोषणाबाजी सुरू असल्याने तणाव वाढू लागला. त्याची माहिती कळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा आदिवासी भवनाजवळ पोहचला. त्यांनी जमावाची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. 
 
अखेर जमाव शांत झाला 
आतमध्ये डांबून ठेवलेल्यांचा या प्रकरणात काही दोष नसल्याचे नेतृत्व करणारांच्या लक्षात आणून देण्यात आले. एवढेच नव्हे तर संबंधित वरिष्ठ अधिका-यांची भेट घालून देण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे जमाव शांत झाला. त्यानंतर रात्री १०.१५ च्या सुमारास त्यांनी प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले. 

Web Title: Lock the entrance to the tribal house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.