Lockdown 4.0 केंद्राचा झाला; राज्याचा आज निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 06:41 AM2020-05-31T06:41:46+5:302020-05-31T06:42:17+5:30

मुख्यमंत्री-शरद पवार यांच्यात झाली चर्चा

Lockdown 4.0 took center yesterday; State will decide today | Lockdown 4.0 केंद्राचा झाला; राज्याचा आज निर्णय

Lockdown 4.0 केंद्राचा झाला; राज्याचा आज निर्णय

Next

विशेष प्रतिनिधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याबाबत राज्य शासनाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. रविवारी याबाबत घोषणा करण्यात येईल. कंटेन्मेंट झोन वगळता अन्यत्र लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी ‘लोकमत’ला दिली.


कंटेन्मेंट झोन सोडून लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याची मुभा केंद्राने राज्यांना दिलेली आहे. तथापि, राज्यातील परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फारसे इच्छुक नसल्याचे समजते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व महाविकास आघाडी सरकारचे मुख्य मार्गदर्शक असलेले शरद पवार हे लॉकडाऊन शिथिल करून अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न व्हावा, या मताचे आहेत. पवार यांनी शनिवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्याशी वर्षा निवासस्थानी त्यादृष्टीने चर्चा केली. कंटेन्मेंट झोन वगळता अन्यत्र काही व्यवहार सुरू करण्याचा आग्रह पवार यांनी यावेळी धरला, असे सूत्रांनी सांगितले. लॉकडाऊनबाबत शासनाला शिफारशी करण्यासाठी वित्त विभागाचे अतिरिक्तमुख्य सचिव मनोजकुमार सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली सहा आयएएस अधिकाऱ्यांची समिती आहे.

या समितीने लॉकडाऊन काही बाबतीत शिथिल करावा, असे सुचविले आहे. खासगी कार्यालये ३३ टक्के उपस्थितीने सुरू करावीत, शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती किमान १५ टक्के करावी, हॉटेल्समधून पार्सल सेवा सुरू करावी, अशा शिफारशीही केल्या आहेत. १० जूनपर्यंत लॉकडाऊन तसाच ठेवावा व नंतर परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असाही सूर आहे, तर मुंबई, मालेगाव, ठाणे, पुणे या पालिकांचे क्षेत्र वगळून अन्य पालिकांमध्ये काही नियम शिथिल करता येतील का, यावरही विचार सुरू आहे.

Web Title: Lockdown 4.0 took center yesterday; State will decide today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.