अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा ७ दिवसांची संचारबंदी; तीन शहरं कंटेनमेंट झोन घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 08:30 PM2021-02-27T20:30:41+5:302021-02-27T20:31:05+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात २२ फेब्रुवारीपर्यंत सुरू असणारे लॉकडाऊन पुन्हा आठ दिवसांसाठी वाढविण्यात आलेले आहे.
अमरावती : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात २२ फेब्रुवारीपर्यंत सुरू असणारे लॉकडाऊन पुन्हा आठ दिवसांसाठी वाढविण्यात आलेले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी काढले आहेत.
अमरावती महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका व भातकुली नगरपंचायत क्षेत्र व लगतचा काही परिसर कंटेनमेंट झोन घोषित ठिकाणी १ मार्चच्या सकाळी ६ वाजतापासून ८ मार्चच्या सकाळी ६ वाजतापर्यंत संचारबंदी राहणार आहे. अमरावतीलगतचे बिझिलॅण्ड, सिटीलॅण्ड, ड्रिमलॅण्ड मार्केटचा परिसर, तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, अचलपूर तालुक्यातील कांडली, देवमाळी तसेच भातकुली नगरपंचायत, तसेच अंजनगाव सुर्जी शहरातलगतचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. तिथेही संचारबंदी लागू करण्यात आली असून, या सर्व ठिकाणी सकाळी ८ ते ३ वाजतापर्यंत जीवनावश्यक सेवा, दुकाने सुरू राहतील. याव्यतिरिक्त जिल्ह्याच्या उर्वरित क्षेत्रात यापूर्वी लागू निर्बंध व सवलती कायम आहेत. त्यानुसार तिथे दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत.