Lockdown: राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 05:42 PM2021-04-11T17:42:09+5:302021-04-11T18:04:04+5:30

CM Uddhav Thackeray meeting with Covid19 Task Force: राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन असावा, यावर ही चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे सचिव सीताराम कुंटे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह  राज्यातील मोठमोठे डॉक्टर उपस्थित आहेत.

Lockdown: How many days of lockdown in Maharashtra? Chief Minister Uddhav Thackeray meeting with Corona Task Force | Lockdown: राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आग्रही

Lockdown: राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आग्रही

googlenewsNext

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्व पक्षीय बैठकीत लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सांगितले होते. याला विरोधकांनीदेखील सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत कोरोना टास्क फोर्सची (Corona Task Force) बैठक सुरु झाली असून आजच यावर निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. (CM Uddhav Thackeray meeting started with covid Corona Task Force in Mumbai on Lockdown in Maharashtra.)


राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन असावा, यावर ही चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे सचिव सीताराम कुंटे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह  राज्यातील मोठमोठे डॉक्टर उपस्थित आहेत. या टास्क फोर्सच्या सदस्यांनी 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याच्या बाजुने मत नोंदविले आहे. 
काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सामान्यांच्या सोयीसाठी काय करता येईल याबाबत नियमावली बनविण्यात येणार आहे. राज्यात 8 दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. दोन तास ही बैठक चालली. यामध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadanvis)  सामान्यांचा उद्रेक होणार नाही असा निर्णय घ्यावा, आमचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे. वेगवेगळ्या घटकांचा विचार व्हावा, लोकांसाठी काय प्लॅनिंग आहे हे तयार करावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. अजित पवारांनी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी काय पॅकेज देता येईल ते सोमवारी ठरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. 


राजेश टोपे यांनी उद्यापासून लगेचच लॉकडाऊन करण्यात येणार नाही, काही दिवसांचा वेळ देऊन ल़ॉकडाऊन केला जाईल, असे सांगितले आहे. यामुळे थोड्याच वेळात 8 दिवस की 14 दिवसांचा लॉकडाऊन होणार यावर निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी लॉकडाऊन करण्याआधी तीन कामकाजी दिवसांचा वेळ द्यावा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 
 

Web Title: Lockdown: How many days of lockdown in Maharashtra? Chief Minister Uddhav Thackeray meeting with Corona Task Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.