Lockdown in Maharashtra: राज्यात लॉकडाऊन की कठोर निर्बंध? निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 11:39 AM2022-01-08T11:39:20+5:302022-01-08T11:40:07+5:30

CoronaVirus in Maharashtra: मुंबई महानगरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदीसारख्या कठोर उपाययोजनांची चर्चा सुरू आहे. निर्बंधांच्या संदर्भातील एक प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविण्यातही आला होता.

Lockdown or strict restrictions in the Maharashtra? The decision will be taken by Chief Minister Uddhav Thackeray | Lockdown in Maharashtra: राज्यात लॉकडाऊन की कठोर निर्बंध? निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार

Lockdown in Maharashtra: राज्यात लॉकडाऊन की कठोर निर्बंध? निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार

googlenewsNext

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे. लॉकडाऊन किंवा रात्रीच्या संचारबंदीसारखे कठोर निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतरच घेण्याची भूमिका मुख्यमंंत्री ठाकरे यांनी घेतल्याचे समजते. दरम्यान, मुख्य सचिव देबशीष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त आणि जिल्हाधिका-यांच्या मॅरेथॉन बैठकीत राज्यभरातील स्थितीचा आढावा घेण्यात आला.

मुंबई महानगरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदीसारख्या कठोर उपाययोजनांची चर्चा सुरू आहे. निर्बंधांच्या संदर्भातील एक प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविण्यातही आला होता. मात्र, लॉकडाऊन किंवा निर्बंधांबाबत राष्ट्रीय पातळीवर निकष असायला हवेत, अशी भूमिका राज्याची आहे. त्यामुळे अगदी विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही पंतप्रधानांसोबतच्या चर्चेनंतर अथवा केंद्राकडून स्पष्टता आल्यानंतर घेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

दरम्यान, मुख्य सचिव देवशीष चक्रवती यांनी आज सायंकाळी वरिष्ठ अधिका-यांसोबतच्या मॅरेथॉन बैठकीत राज्यातील विविध भागांतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. सध्या मुंबई महानगर परिसरातच मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून आली आहे. सर्वाधिक लसीकरण याच भागात झाल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे राज्याच्या इतर भागात विशेषत: ग्रामीण भागातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

निर्बंध लावण्याची तयारी सुरू
वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे पुन्हा एकदा ‘ब्रेक द चेन’नुसार निर्बंध लावण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. जेणेकरून गर्दी टाळणे, अनावश्यक कार्यक्रम रोखता येणे शक्य होणार आहे. याशिवाय प्रशासनाला आवश्यक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हानिहाय ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. तसेच मार्चपर्यंत कोरोना निधीची तयारी करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Lockdown or strict restrictions in the Maharashtra? The decision will be taken by Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.