राज्यात लॉकडाऊन, पण 'या' अकरा ठिकाणी कडक निर्बंध असणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 05:24 PM2020-06-29T17:24:27+5:302020-06-29T17:57:55+5:30

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.

Lockdown in the state, but there will be strict restrictions on 'this' eleven places | राज्यात लॉकडाऊन, पण 'या' अकरा ठिकाणी कडक निर्बंध असणार

राज्यात लॉकडाऊन, पण 'या' अकरा ठिकाणी कडक निर्बंध असणार

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून ज्याठिकाणी आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला नव्हता, अशा ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे.

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात 'मिशन बिगिन अगेन'चा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत असणार आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र, 31 जुलैपर्यंत टप्याटप्याने शिथिलता दिली जाणार आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यास संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतात. एमएमआर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसेच कार्यालयात जाणाऱ्यांना दूरचा प्रवास करता येणार आहे. याशिवाय, खरेदीसाठी जवळच्या बाजारात जाता येईल, पण लांब जाता येणार नाही.

कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली होती. मात्र त्यानंतर राज्यातील अनेक भागात कोरोनाचा वेगाने फैलाव सुरू झाला. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून ज्याठिकाणी आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला नव्हता, अशा ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे अधिक कोरोना रूग्ण असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असणार आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतला आवाहन केले की, अद्याप काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण मिशन बिगेन अगेन सुरु करतोय. मात्र, लॉकडाऊन सुरुच राहणार आहे. त्यानंतर, सरकारने 31 जुलैपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवला आहे.

राज्यात काल 24 तासांत 5493 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर  2330 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत 86,575 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 70,637 इतकी झाली आहे.

आणखी बातम्या...

1 जुलैपासून नियमांत मोठे बदल! आता आधारद्वारे घरबसल्या सुरू करता येणार स्वत:ची कंपनी

10 जुलैपर्यंत सरकार COVID Insurance Policy आणणार, 50 हजारांपासून होणार सुरूवात

CoronaVirus News : दिल्लीत प्लाझ्मा बँक सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी लोकांना केलं 'हे' महत्त्वपूर्ण आवाहन
 

Web Title: Lockdown in the state, but there will be strict restrictions on 'this' eleven places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.