राज्यात पुन्हा टोळधाड येणार; सर्वेक्षण यंत्रणेने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 04:52 AM2020-06-18T04:52:16+5:302020-06-18T04:53:26+5:30
टोळधाड पुन्हा परतण्याचे जोधपूरच्या यंत्रणेकडून संकेत
अकोला : विदर्भात फळे, पिकांचे प्रचंड नुकसान केल्यानंतर मध्य प्रदेशाकडे गेलेली टोळधाड पुन्हा राज्यात परतण्याचा धोका वाढला आहे, असा इशारा जोधपूर येथील टोळधाड सर्वेक्षण यंत्रणेने दिला आहे.
टोळधाड या नाकतोडावर्गीय किडींनी २४ मेच्या दरम्यान राजस्थान, गुजरातमार्गे पश्चिम विदर्भातील सातपुडा पर्वत रांगामार्गे अमरावती जिल्ह्यात प्रवेश केला. या किडीने वर्धा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील रामटेक, भंडारा, मौदा, आदींसह बहुतांश ठिकाणी फळे, पिकांचे, अतोनात नुकसान केले. या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी ड्रोनद्वारे १५ दिवस कीटकनाशक फवारणी करण्यात आली. परंतु ही टोळधाड पुन्हा परतण्याचे संकेत जोधपूरच्या यंत्रणेने दिल्याची माहिती कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी दिली.