“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:09 AM2024-10-07T06:09:34+5:302024-10-07T06:09:53+5:30

लोकसभेत महायुतीत असताना मनसेने चांगले काम केले आहे, हे मी सर्वांसमक्ष सांगितले आहे. पण भविष्यामध्ये काही दिवसांत काय होते, याची आपल्याला वाट पाहावी लागेल, याकडे श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले.

lok sabha calculations were different and senior mahayuti leaders will take decision about mns said mp shrikant shinde | “लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे

“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : लोकसभेच्या वेळी वेगळी गणिते होती. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते ठरवितात. भविष्याबाबत जो आदेश पक्षनेतृत्व देईल, तो पाळण्याचे काम आम्ही करू, काही दिवसांमध्ये काय होतेय, याची वाट पाहावी लागेल, असे विधान शिंदेसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी केले.

डॉ. शिंदे फाउंडेशनच्या वतीने डीएनसी ग्राउंडमध्ये आयोजित रासरंग गरब्यानिमित्त खा. शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते बोलत होते. खा. शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मनसेमहायुतीत होती. कल्याण लोकसभेत कल्याण ग्रामीणचे आमदार म्हणून मनसेचे राजू पाटील हे एकमेव आमदार आहेत. ग्रामीणमध्ये खासदार शिंदे यांना मते मिळाली होती. त्यामुळे शिंदेसेना आपला उमेदवार याठिकाणी न देता मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे. 

लोकसभेत महायुतीत असताना मनसेने चांगले काम केले आहे, हे मी सर्वांसमक्ष सांगितले आहे. पण भविष्यामध्ये काही दिवसांत काय होते, याची आपल्याला वाट पाहावी लागेल, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.
 

Web Title: lok sabha calculations were different and senior mahayuti leaders will take decision about mns said mp shrikant shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.