Lok Sabha Election 2019: भाजपा व मित्रपक्षांत जागांचे पेच कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 05:50 AM2019-03-14T05:50:19+5:302019-03-14T05:51:08+5:30
भाजपा आणि त्याचे मित्र पक्ष शिवसेना आणि जनता दल (संयुक्त) यांच्या अनुक्रमे महाराष्ट्र व बिहारमध्ये किती जागा लढायच्या हे ठरले असले तरी त्या नेमक्या कुठल्या हे ठरलेले नाही.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : भाजपा आणि त्याचे मित्र पक्ष शिवसेना आणि जनता दल (संयुक्त) यांच्या अनुक्रमे महाराष्ट्र व बिहारमध्ये किती जागा लढायच्या हे ठरले असले तरी त्या नेमक्या कुठल्या हे ठरलेले नाही. त्यासाठी भाजपाला बरीच शक्ती खर्च करावी लागत आहे.
बिहारमध्ये भाजपा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना खुश ठेवण्यासाठी पाच जागांवरील दावा सोडून देईल. पण महाराष्ट्रात मात्र भाजपाने जास्तीच्या जागा शिवसेनेला देऊनही अडचणी दूर होत नाहीत. भाजपाच्या सूत्रांनुसार, संसदीय मंडळाची बैठक १५ व १६ मार्च रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील ९१ जागा आणि दुसऱ्या टप्प्यातील ९७ जागांसाठीच्या उमेदवारांची घोषणा या बैठकीत केली जाईल. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील सात आणि १० जागा दुसऱ्या टप्प्यातील आहेत. संसदीय मंडळाच्या बैठकीच्या आधी शिवसेनेसोबतचे जागा वाटप अंतिम व्हावे, असे भाजपाला
हवे आहे.