Lok Sabha Election 2019: छगन भुजबळ यांनी दिली पुतण्या समीरला संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 04:22 AM2019-03-16T04:22:51+5:302019-03-16T04:23:18+5:30

प्रकृतीस्वास्थ्य व प्रचारासाठी राज्यात मागणी पाहता छगन भुजबळ यांनी थांबण्याचा निर्णय घेतल्यानेच उमेदवारीसाठी समीर यांच्याखेरीज सक्षम पर्याय उरला नव्हता.

Lok Sabha Election 2019: Chhagan Bhujbal has given chance to his nephew Sameer | Lok Sabha Election 2019: छगन भुजबळ यांनी दिली पुतण्या समीरला संधी

Lok Sabha Election 2019: छगन भुजबळ यांनी दिली पुतण्या समीरला संधी

Next

नाशिक : येथील लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे कोण, काका की पुतणे? या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून छगन भुजबळ यांच्याऐवजी समीर भुजबळ यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. प्रकृतीस्वास्थ्य व प्रचारासाठी राज्यात मागणी पाहता छगन भुजबळ यांनी थांबण्याचा निर्णय घेतल्यानेच उमेदवारीसाठी समीर यांच्याखेरीज सक्षम पर्याय उरला नव्हता.

दिल्लीतील महाराष्टÑ सदन घोटाळा व बेनामी संपत्ती प्रकरणी सुमारे पावणेतीन वर्षे तुरुंगवासात राहिलेले भुजबळ काका-पुतणे अलिकडेच जामिनावर बाहेर आले आहेत. अशात निवडणुकीची घोषणा झाल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राष्टÑवादीतर्फे कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता. भुजबळ यांच्यावर झालेले आरोप व त्यांना भोगावा लागलेला तुरुंगवास पाहता पक्षातील अन्य काही इच्छुकांनी त्यादृष्टीने तयारीही चालविली होती.

आता लक्ष राज्याकडे
जामिनावर बाहेर येताच छगन भुजबळ यांनी सरकारवर आक्रमकपणे हल्लाबोल चालविल्याने त्यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात होती. ओबीसी समाजात असलेल्या सहानुभूतीचा लाभ उचलण्याचे आडाखे बांधले जात होते. मात्र त्यांना नाशकात अडकवून ठेवण्याऐवजी समीर यांचा पर्याय पुढे आल्याचे बोलले जाते.

Web Title: Lok Sabha Election 2019: Chhagan Bhujbal has given chance to his nephew Sameer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.