वाऱ्याची दिशा ओळखूनच पवारांची माघार; मुख्यमंत्र्यांनी घेतली फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 06:53 PM2019-03-11T18:53:34+5:302019-03-11T18:53:49+5:30
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत आज 'आजोबा' शरद पवार यांनी दिले.
'वारा कोणत्या दिशेने वाहतोय, हे शरद पवार अचूक ओळखतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. त्यानुसारच, वाऱ्याची दिशा ओळखून पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे', अशी टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवारांची माघार हा भाजपा-शिवसेना युतीचा विजय असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत आज 'आजोबा' शरद पवार यांनी दिले. एकाच कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवावी?, असा प्रश्न करत, नातवासाठी आपण माघार घेणार असल्याचंही त्यांनी सूचित केलं. स्वाभाविकच, शरद पवारांची माघार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
पुन्हा युतीचंच सरकार येईल आणि आपल्याला पंतप्रधान होता येणार नाही, याची जाणीव झाल्यानंच शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचा टोमणा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या निर्णयावर मारला. तर, माढा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव पाहूनच पवारांनी माघार घेतल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
शरद पवारांची माघार हा युतीचा मोठा विजय असल्याचं नमूद करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची हळूच फिरकी घेतली.
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी आधीच सांगितले होते की, श्री शरद पवारजी हे बदललेल्या वाऱ्याची दिशा आधीच ओळखतात !#PhirEkBaarModiSarkarpic.twitter.com/xJPaCCLPxd
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 11, 2019
नातवासाठी आजोबांची माघार, मावळमधून लढणार पार्थ पवार https://t.co/9ewhFcxdi0
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 11, 2019