Lok Sabha Election 2019: प्राप्तिकर विभागाची ४२ मतदारसंघांवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 07:04 AM2019-03-14T07:04:36+5:302019-03-14T07:05:10+5:30

अर्ध्या तासात कारवाई; निवडणुकीतील काळ्या पैशांवर ठेवणार लक्ष

Lok Sabha Election 2019: Look at 42 constituencies of Income Tax Department | Lok Sabha Election 2019: प्राप्तिकर विभागाची ४२ मतदारसंघांवर नजर

Lok Sabha Election 2019: प्राप्तिकर विभागाची ४२ मतदारसंघांवर नजर

Next

पुणे : लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या काळ्या पैशांच्या वापराला आळा बसावा यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दलाची (क्विक रिस्पॉन्स टीम) स्थापना केली आहे. प्राप्तिकरच्या पुण्यातील कार्यालयातून मुंबई वगळता राज्यातील ४८ पैकी ४२ लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाचे (तपास) महासंचालक दीपक कपूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्राप्तिकर विभागाचे (तपास) अतिरिक्त संचालक तथा तपास यंत्रणेचे राज्याचे समन्वयक अजय मोदी, अतिरिक्त संचालक रवी प्रकाश या वेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तिकर विभागाने सतर्क राहावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्राप्तिकर विभागाने तपास यंत्रणा आणि गुप्तचर विभागाला दक्षतेचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. सहायक आयुक्त अथवा उपायुक्तांच्या देखरेखीखाली पाच अधिकाऱ्यांचे पथक यात असेल. त्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे अथवा मौल्यवान वस्तूंच्या वापरावर नजर ठेवली जाणार आहे.

याबाबत माहिती देताना प्राप्तिकर विभागाचे (तपास) महासंचालक कपूर म्हणाले, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ वगळता उर्वरित राज्यातील ४२ मतदारसंघांमधील काळ्या पैशाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पुणे कार्यालयावर असेल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सोमवारी (दि. ११) नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. पाठोपाठ प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दल स्थापण्यात आले. राज्यातील ४२ मतदारसंघांचे नाशिक, नागपूर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर असे पाच विभाग करण्यात आले असून, त्याच्या नियंत्रणाची जबाबदारी अतिरिक्त संचालक आणि चार सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मतदाराला प्रभावित करण्यासाठी पैसे, सोने, चांदी अथवा मौल्यवान वस्तूंचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. निवडणूककाळात काळ्या पैशांचा वापर करताना आढळल्यास, नागरिकांनी प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी चोवीस तास निरीक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तक्रार करण्यासाठी अथवा माहिती देण्यासाठी १८००२३३०७०० अथवा १८००२३३०७०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय ७४९८९७७८९८ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अवघ्या अर्ध्या तासात कारवाई करण्यात येईल.

काळा पैसा बाळगणाºयांना मिळणार ‘दंड’
निवडणुकीदरम्यान काळा पैसा आढळणाºयांवर प्राप्तिकर विभागाकडून ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी कारवाई होईल. दंडासह ती रक्कम भरावी लागेल.
अनेकदा नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून अशा रकमेचा निवडणुकीत वापर केला जातो. त्यामुळे रकमेचा स्रोत देखील तपासण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त पोलीसह संबंधितांवर वेगळी कारवाई करतील.

निवडणुकात होणारा काळा पैशांचा वापर रोखण्याची जबाबदारी प्राप्तिकर विभागावर आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती प्राप्तिकर विभागाला टोल-फ्री क्रमांकाद्वारे कळवावी. याशिवाय बँक खात्यातून होणाºया उलाढालीवर देखील नजर ठेवण्यात येणार आहे. संबंधित बँकांनी संशयित व्यवहार, अचानक मोठ्या प्रमाणात झालेली पैशांची उलाढाल याची माहिती कळविल्यास, त्याचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- दीपक कपूर, महासंचालक
(तपास), प्राप्तिकर विभाग

Web Title: Lok Sabha Election 2019: Look at 42 constituencies of Income Tax Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.