मनसेची भाजपसाठी खोचक प्रश्नपत्रिका; २ दिवसांत सोडविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 02:46 PM2019-04-27T14:46:44+5:302019-04-27T14:48:49+5:30

सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकांचीच चर्चा सुरू झाली होती. मात्र ही चर्चा सुरू होत नाही, तोवर मनसेने भाजपच्या प्रतिहल्ल्याला उत्तर देण्याच्या उद्देशाने एक अनोखी प्रश्नपत्रिका आणली आहे.

LOk Sabha Election 2019 MNS ask question paper to BJP | मनसेची भाजपसाठी खोचक प्रश्नपत्रिका; २ दिवसांत सोडविण्याचे आव्हान

मनसेची भाजपसाठी खोचक प्रश्नपत्रिका; २ दिवसांत सोडविण्याचे आव्हान

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीत कुठही नसलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि सत्ताधारी भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी अनेक सभेत भाजप आणि नरेंद्र मोदींच्या दुटप्पी भूमिकेची पुराव्यासहित पोलखोल केली. त्याला भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले. पुरसे ठरले नाही, म्हणून भाजपने देखील मनसे स्टाईल वापरत राज ठाकरे यांना प्रश्न विचारले. हे ताजे असतानाच आता मनसेने पुन्हा एक युक्ती लढवत भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न लावला आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईत एका सभेत राज ठाकरे यांची आधीचे भाषणे दाखवून पोलखोल केली. त्यामुळे सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकांचीच चर्चा सुरू झाली होती. मात्र ही चर्चा सुरू होत नाही, तोवर मनसेने भाजपच्या प्रतिहल्ल्याला उत्तर देण्याच्या उद्देशाने एक अनोखी प्रश्नपत्रिका आणली आहे.

मुंबई मनसेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५६ गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात आली आहे. तसेच सरकारच्या मागील पाच वर्षांतील कामकाजावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. विषेश टीप म्हणून फडणवीस आणि मोदींना प्रश्न सोडवताना थोडी सूट दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. शुद्धलेखनाच्या नियमांची अट नाही, प्रश्न पत्रिका सोडविण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी अर्थात मतदानापूर्वीपर्यंत, उत्तरांसाठी संपूर्ण भाजप पक्ष, सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांची मदत घेण्यास मुभा, परीक्षेसाठी केंद्रावर येण्याची गरज नसून घरी बसून किंवा कार्यलयातून प्रश्न सोडवू शकता.

प्रश्नपत्रिकेत खोचक प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे हे पाकिस्तानमधील कोणत्या नेत्याला वाटते, महाराष्ट्रातील कोणता नेता शेतकऱ्यांना 'साले' म्हणतो, जवानांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य कोणत्या भाजप आमदाराने केले, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कधी होणार, आजवर पंतप्रधानांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या, पंतप्रधान किती देश फिरले, त्यातून काय साध्य झाले, राफेल करारावर पंतप्रधान जाहीरपणे स्पष्टीकरण का देत नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. यावर आता भाजप काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: LOk Sabha Election 2019 MNS ask question paper to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.