Lok Sabha Election 2019 : अमरावतीतून नवनीत राणा यांची मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 02:21 PM2019-05-23T14:21:52+5:302019-05-23T20:17:05+5:30
आघाडीला विदर्भात काही प्रमाणात दिलासा मिळताना दिसत आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर असताना आता अभिनेत्री आणि राजकारणात दाखल झालेल्या आघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना खासदार आनंदरावर अडसूळ यांचा मार्ग खडतर दिसत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. राज्यात देखील भाजप आणि शिवसेना सुसाट असून २०१४ पेक्षा यावेळी अधिक युतीला अधिक य़श मिळाले आहे. मात्र त्याचवेळी अमरावती मतदार संघातून आघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा आघाडीवर आहेत.
आघाडीला विदर्भात काही प्रमाणात दिलासा मिळताना दिसत आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर असताना आता अभिनेत्री आणि राजकारणात दाखल झालेल्या आघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना खासदार आनंदरावर अडसूळ यांचा मार्ग खडतर दिसत आहे.
अमरातीची लढत चुरशीची होत असून नवनीत कौर राणा ३६६४७ मतांनी आघाडीवर आहेत. अमरावती मतदार संघ शिवसेनाचा गड मानला जातो. २०१४ मध्ये नवनीत राणा यांनी आनंदराव अडसुळांना चांगलीच टक्कर दिली होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी मात्र नवनीत राणा आघाडीवर असून चांगलीच टक्कर देत आहेत. या व्यतिरिक्त चंद्रपूरमधून सुरेश धानोकर सात हजारांनी आघाडीवर असून केंद्रीयमंत्री हंसराज अहिर पिछाडीवर आहे. मागील तीन टर्मपासून हा मतदार संघ भाजपकडे आहे.