भर उन्हात उमेदवार मतांसाठी तर नागरीक पाण्यासाठी घराबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:59 PM2019-04-09T12:59:19+5:302019-04-09T13:04:41+5:30
२०१४ लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराला मत मागण्यासाठी जात असताना नागरिकांच्या पाणी प्रश्नाच्या रोषाला समोर जावे लागत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात १५ दिवसांतून एकदा पाणी येते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागत आहे.
मुंबई - प्रत्येक निवडणुकीत उमेदवार वीज, पाणी, रस्ते देणार म्हणून आपल्या जाहीरनाम्यात उल्लेख करत असतात. उमेदवार निवडून आला की दिलेल्या आश्वासनांचा मात्र त्यांना विसर पडतो. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे मात्र उमेदवारांची गोच्ची पाहायला मिळत आहे. भर उन्हात उमेदवार प्रचारासाठी गावो-गावी फिरत आहेत. मात्र नागरीक उमेदवारापेक्षा पिण्याच्या पाण्याला महत्व देताना दिसत आहेत.
२०१४ लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराला मत मागण्यासाठी जात असताना नागरिकांच्या पाणी प्रश्नाच्या रोषाला समोर जावे लागत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात १५ दिवसांतून एकदा पाणी येते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी होणारी हेळसांड यामुळे नागरिकांमध्ये सत्ताधारीविषयी प्रचंड रोष दिसत आहे.
औरंगाबाद- जालना लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवार यांना शहरातील पाणी टंचाई मुळे नागरिकाच्या प्रश्नांना उत्तरे देणे कठीण झाले आहे. पाणी टंचाईमुळे उमेदवारांना पराभवाची भीती जाणवत आहे. त्यामुळेच युतीच्या शिष्ठमंडळाने विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन पाणी टंचाईवर नियोजन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.
परभणी लोकसभा मतदारसंघात ही तीच परिस्थिती पहायला मिळत आहे. शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार प्रचारात दंग आहे तर दुसरीकडे नागरीक पाण्यासाठी तंग आहेत.
महाराष्ट्रातील मराठवाड्याप्रमाणे आनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचा जोर वाढला आहे. तर दुसरीकडे पिण्याची पाणी टंचाई सुद्धा वाढत चालली आहे. उमेदवार मतासाठी तर नागरीक पाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.